Interfaith Marriage Cerem: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सातवा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा
सातवा सर्वधर्मीय विवाह सोहळा, गरजूंनी लाभ घ्यावा: विनोद खटके
लातूर (Interfaith Marriage Ceremony) : येथील व्ही. एस. पँथर्स युवा संघटनेच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सातवा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क लातूर येथे 10 मे 2026 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याच्या (Interfaith Marriage Ceremony) नियोजनाची पहिली बैठक संस्थापक अध्यक्ष विनोद भाऊ खटके यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रदेशाध्यक्ष सचिन भाऊ मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी संपर्कप्रमुख आनंद जाधव, मराठवाडा अध्यक्ष निलेश कांबळे ,विद्यार्थी आघाडी मराठवाडा अध्यक्ष इंजि. प्रीतम दंडे, जिल्हाध्यक्ष शरद किनीकर, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष किरण पायाळ, ऑटो युनियन जिल्हाध्यक्ष देवा गायकवाड विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष स्वप्निल कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष अकबर शेख , जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब गायकवाड, सिद्धार्थ वाघचौरे, विनोद वाघचौरे, शहराध्यक्ष असद भाई शेख, कामगार आघाडी शहराध्यक्ष गौस भाई शेख, वाहतूक आघाडी शहराध्यक्ष शाहरुख मणियार हे उपस्थित होते.
यावेळी निलेश कांबळे प्रीतम दंडे, किरण पायाळ गोविंद कांबळे, स्वप्नील कांबळे एडवोकेट रमक जोगदंड इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले. या बैठकीला औसा शहराध्यक्ष महेश कांबळे, निलंगा तालुकाध्यक्ष धनराज सुरवसे, पानगाव शहराध्यक्ष भूषण आचार्य, अहमदपूर तालुकाध्यक्ष आदित्य गुळवे, रोहन कांबळे,धम्मा वाघचौरे नारायण चव्हाण, कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष हुसेन मांदळे, शहर उपाध्यक्ष युनुस शेख, सुरज शिंदे, विद्यार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष महादेव कांबळे, ऋषिकेश ढगे, शहराध्यक्ष आविष्कार कांबळे, प्रदीप सरवदे यांच्यासह जिल्हाभरातील पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी विनोद खटके यांनी बोलताना सांगितले की, सर्व पदाधिकाऱ्यांनी लातूर जिल्ह्यातील गाव खेड्यापर्यंत गरजवंत माणसापर्यंत सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याची माहिती पोहोचवायची आहे. या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यातून (Interfaith Marriage Ceremony) आपल्याकडे जेवढी जोडपी येथील तेवढ्या जोडप्यांचा विवाह त्यांच्या त्यांच्या रितीरिवाजानुसार थाटात पार पडण्यात येईल. यासाठी गरजवंतानी या विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आपल्या मुलाबाळांचा विवाह संपन्न करून घ्यावा, असे आवाहन केले.