Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

ट्रॅक्टरची दुचाकीला धडक

कळमनुरी ते ढोलक्याची वाडी या रस्त्यावर इंदिरानगर जवळ 28 मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान ट्रॅक्टरने समोरून येणाऱ्या दुचाकी ला धडक दिली.


ट्रॅक्टरची दुचाकीला धडक 

Kalmanuri Accident |

एक गंभीर जखमी

कळमनुरी (Kalmanuri Accident) : कळमनुरी ते ढोलक्याची वाडी या रस्त्यावर इंदिरानगर जवळ 28 मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान विना क्रमांकाचे ट्रॅक्टर कळमनुरीहुन ढोलक्याचीवाडी येथे जाणाऱ्या ट्रॅक्टरने समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक एम एच 38 एसी 4709 या दुचाकी ला धडक दिली. या धडकेत दुचाकी वरील विशाल रामराव गुहाडे व ज्ञानेश्वर गुहाडे रा. ढोलक्याची वाडी हे दोघे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे, जमादार संजय राठोड गुलाब जाधव दत्ता दहातोंडे हे घटनास्थळी जाऊन जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या जखमेवर डॉक्टर संजय माहुरे यांनी उपचार केले यातील गंभीर जखमी असलेल्या विशाल गुहाडे यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले. तर किरकोळ जखमी असलेल्या ज्ञानेश्वर गुहाडे यांना पुढील उपचारासाठी हिंगोली येथे पाठविण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी अपघातातील ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात लावण्यात आले. ट्रॅक्टर चालक फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related to this topic: