Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

जिंतूर युवक हल्ला

जिंतूरात जुन्या वादातून छाटला युवकाचा हाताचा मनगट

Jintur Youth Attack: जिंतूरच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात रविवारी दुपारी एका युवकावर धारदार शस्त्राने अचानक हल्ला करण्यात आला.


जिंतूरात जुन्या वादातून छाटला युवकाचा हाताचा मनगट

Jintur Youth Attack |

 

धारदार शस्त्राने भरदिवसा हल्ला; गंभीर जखमी युवक जिल्हा रुग्णालयात, आरोपी पसार

परभणी (Jintur Youth Attack) : जिंतूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील दारू दुकानाजवळ रविवारी (दि.१८) दुपारी चारच्या सुमारास जुन्या वादातून एका युवकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात युवकाचा डावा हात मनगटाजवळून छाटला गेल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. गंभीर जखमी अवस्थेत युवकाला प्रथम ग्रामीण रुग्णालयात व नंतर पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, सोहेल नसीर पठाण (वय २५, रा. मरवा मस्जिद परिसर, जिंतूर) हा रविवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील एका दारू दुकानाच्या मैदानात असताना जुन्या वादाच्या कारणावरून आरोपी युवकाने त्याच्यावर अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला. या (Jintur Youth Attack) हल्ल्यात सोहेलच्या डाव्या हाताचे मनगट जवळपास छाटले गेले. गंभीर जखमेमुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी युवकाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. वाघ यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात रेफर केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, बिट जमादार महेश गजभारे तसेच परभणी गोपनीय शाखेचे पोलिस हवालदार जिया खान पठाण यांनी रुग्णालयात भेट देत प्राथमिक चौकशी केली. उशिरापर्यंत या प्रकरणी जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. भरदिवसा घडलेल्या या थरारक घटनेमुळे जिंतूर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना

घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीच्या शोधासाठी पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिंतूर पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Related to this topic: