Breaking News
  • राम चरणच्या वाढदिवशी चाहत्यांना सरप्राईज; ‘पेड्डी’चा दमदार टीझर प्रदर्शित
  • सावधान!!...नाहीतर देशात लॉकडाऊन लागू होणार?
  • आयपीएल 2026: 'या' 5 दिग्गज खेळाडूंना 'जीरो से हीरो' बनण्याची संधी!
  • आयपीएल 2026: संपूर्ण वेळापत्रक जाहीर, पहिल्याच दिवशी RCB Vs हैदराबाद
  • नेपाळचे नवे पंतप्रधान: बालेन्द्र शाह आज शपथबद्ध
  • डिजिटल मोबाईल अँपच्या माध्यमातून होणार 2027 ची जनगणना
  • महाराष्ट्राचे इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन
  • आता दुचाकीसाठी मिळणार फक्त 200 रुपयांचे पेट्रोल
  • नोरा फतेहीच्या 'सरके चुनरिया' या गाण्याविरोधात सरकारची मोठी कारवाई

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

कलाविष्कारातून संस्कृती जतन

'शब्दांच्या पलीकडे': स्त्रिशक्तीचा अनोखा गौरव

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 'शब्दांच्या पलीकडे':स्त्री शक्तीचा अनोखा गौरव या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


शब्दांच्या पलीकडे स्त्रिशक्तीचा अनोखा गौरव 

International Women's Day |

बोरखेडी (रेल्वे) येथे जागतिक महिला दिन उत्साहात

नागपूर (International Women's Day) : महिलांचे कर्तृत्व हे केवळ शब्दात मांडता येण्यासारखे नसून ते कृतीतून सिद्ध होते.हेच दाखविण्यासाठी बोरखेडी (रेल्वे) ग्रामपंचायत च्या सरपंच स्वाती धुर्वे यांच्या संकल्पनेतून रविवार दि १५ मार्च ला येथील ग्रामपंचायत परिसरात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 'शब्दांच्या पलीकडे':स्त्री शक्तीचा अनोखा गौरव या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत सरपंच स्वाती धुर्वे तर प्रमुख अतिथी म्हणून महिला व प्रसूती रोग तज्ञ डॉ प्रीती चौधरी, बुटीबोरी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण  सभापती संध्या आंबटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य वृंदा नागपुरे, नागपूर पंचायत समिती चे माजी उपसभापती संजय चिकटे, समाजसेवक किशोर धुर्वे, ग्रामपंचायत अधिकारी गणेश राऊत आदी उपस्थित होते.

महिलांना केवळ कागदोपत्री हक्क न देता, त्यांना प्रत्यक्ष न्याय मिळावून देणे आणि सामाजिक बदलासाठी कृती करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्य अतिथी माजी जी प सदस्य वृंदा नागपुरे यांनी सांगितले. लिंग समानता, स्त्रियांचे आरोग्य आणि महिला सुरक्षा यावर डॉ प्रीती चौधरी यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. तर "महिला ही घराचा आणि समाजाचा कणा आहे. जेव्हा आपण महिलांना समान संधी आणि सुरक्षित वातावरण देतो, तेव्हा संपूर्ण समाजाची प्रगती होत असल्याचे मत माजी उपसभापती संजय चिकटे यांनी व्यक्त केले. सर्वप्रथम उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व माँ जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्राबाई फुले, माता रमाई यांच्या प्रतिमाणा पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाला रीतसर सुरुवात करण्यात आली.

त्यानंतर 'ती' चा प्रवास उलगडणारे,विविध संस्कृतीवर आधारित तसेच आदिवासी संस्कृतीवर महिलांनी बहारदार सामूहिक नृत्य सादर केले. तर "स्त्रीचे अस्तित्व शब्दांच्या पलीकडे आहे." या विषयावर सरपंच स्वाती धुर्वे यांनी अध्यक्षीय भाषण केले. तत्पूर्वी आरोग्य, शिक्षण आणि विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सावित्रीच्या लेकीचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत च्या वतीने स्वच्छतेचे महत्व पटवून देत उपस्थित महिलांना कचरा संकलन करण्याकरिता डस्ट बिन (कचरा पेटी) चे वितरण करण्यात आले असून उर्वरित महिलांना घरोघरी जाऊन वितरण करण्याचे आश्वासन सरपंच स्वाती धुर्वे यांनी दिले.

या (International Women's Day) कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य मेघा फंड, लीना रावळे, दिपाली मसराम, कमला भोजने, दीपचंद कांबळे,सीआरपी शंभरकर, उंदीरवाडे,माजी प सं सदस्य उर्मिला मिलमिले,माजी सरपंच अनिता नानवटे, माजी ग्रा प सदस्य देवकी इवनाते,माला फंड, अर्चना चिकटे,प्रणिता नंदनवार, नगराळे मॅडम, देशमुख मॅडम, सर्व बचत गट अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य तसेच ग्राम संघाचे सर्व महिला भगिनी व बोरखेडी येथील शेकडो महिला भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related to this topic: