Breaking News
  • हिंगोलीत आरोग्य प्रशासनाचा अनास्थेपना, जिल्ह्यात दाखल झालेल्या तीन शववाहिका धूळखात पडून
  • अमरावती पोलिस अंमलदारच निघाला गुटखा तस्कर; शहर पोलिस दलात खळबळ
  • दुपारी २.३० वाजता पुण्यातील पत्रकार संघात अभिजित दिबके यांची पत्रकार परिषद
  • बुलढाण्यात खडकपूर्णा धरणाच्या पाणीपुरवठा लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • पुण्यातील महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी
  • बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरमध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्या दुपारी चार वाजता कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन
  • पुण्यात उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विद्यापीठाकडून परवानगी
  • पुण्यात बीडीडीएस कडून संपूर्ण पालिका इमारतीचा तपास पूर्ण; बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून महापौर कार्यालय, आयुक्त कार्यालय यासह सगळ्या कार्यालयांची तपासणी

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

मानोरा डिझेल टंचाई

खरिपाच्या तोंडावर मानोरा तालुक्यात डिझेल टंचाई

Manora diesel shortage: मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या कामांना डिझेल टंचाईने बाधा पडण्याची समस्या झाली आहे.


खरिपाच्या तोंडावर मानोरा तालुक्यात डिझेल टंचाई

Manora diesel shortage |

 

शेतीची कामे मंदावली; शेतकऱ्यांना दिवस-रात्र डिझेलची प्रतीक्षा

मानोरा (Manora diesel shortage) : खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला असताना खरीप हंगाम पूर्व मशागती कामांच्या तयारीत व्यस्त असतानाच मानोरा तालुक्यात डिझेल टंचाईचे संकट अधिकच गडद झाले आहे. अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलचा पुरवठा अपुरा पडत असल्याने शेतकऱ्यांना दिवस-रात्र डिझेलची प्रतीक्षा करावी लागत असून, काही ठिकाणी रिकाम्या हाताने परतण्याची वेळ येत आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे.

मानोरा तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील अनेक पेट्रोल पंपांवर (Manora diesel shortage) मागील काही दिवसांपासून डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. शेतीची बहुतांश कामे ट्रॅक्टर, तसेच यंत्राच्या सहाय्याने होत असल्याने त्याकरिता डिझेलची मोठी आवश्यकता असते. युद्धजन्य परिस्थितीमुळे पंपावर डिझेल, पेट्रोलचा मोठा तुटवडा पहायला मिळत असल्याने डिझेलसाठी रात्रंदिवस खडा पहारा देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. पहाटेपासूनच अनेक शेतकरी ड्रम, कॅन घेऊन पेट्रोल पंपांवर रांगा लावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक ठिकाणी डिझेल उपलब्ध नाही असे फलक लावण्यात आल्याने शेतकऱ्यांचा संताप व्यक्त होत आहे.

काही पंपांवर मर्यादित डिझेल  (Manora diesel shortage) उपलब्ध असल्याने वाहनधारक आणि शेतकऱ्यांमध्ये वादावादीचे प्रकारही घडत आहेत. वेळेवर मशागत झाली नाही, तर पेरणी उशिरा होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहे. त्यामुळे खरीप हंगाम लक्षात घेता जिल्ह्य प्रशासनाने डिझेल, पेट्रोलचा मुबलक साठा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी होत आहे. हवामान विभागाने यंदा पावसाचा अंदाज समाधानकारक असल्याचे भाकित केले आहे. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी खरिपासाठी मोठ्या अपेक्षा ठेवलेल्या आहेत. मात्र, डिझेल टंचाईमुळे शेतीच्या सुरुवातीच्या कामांनाच अडथळे निर्माण होत आहेत. ट्रॅक्टर चालकांनाही डिझेल अभावी कामे थांबवावी लागत असल्याने शेतीच्या कामाचा वेग मंदावला आहे.

Related to this topic: