Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

पेट्रोल-डिझेल टंचाई

पेट्रोल-डिझेल संदर्भात प्रशासन झाले सक्रिय

Petrol-Diesel Shortage: चिखली तालुक्यात पेट्रोल-डिझेल टंचाईमुळे नागरिकांमध्ये भय निर्माण झाला असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तहसीलदार गावंडे यांनी आवाहन केले.


पेट्रोल-डिझेल संदर्भात प्रशासन झाले सक्रिय

Petrol-Diesel Shortage |

 

अफवांवर विश्वास ठेवू नका; आवश्यकतेपुरतेच इंधन घ्या: तहसीलदार सौरभ गावंडे यांचे आवाहन

चिखली (Petrol-Diesel Shortage) : चिखली तालुक्यात पेट्रोल व डिझेल टंचाईबाबत विविध अफवा पसरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासन सक्रिय झाले असून तहसीलदार सौरभ गावंडे यांनी नागरिकांना कोणत्याही अप्रमाणित माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

तहसीलदार गावंडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, तालुक्यात पेट्रोल व डिझेल (Petrol-Diesel Shortage) पुरवठ्याबाबत प्रशासन संबंधित यंत्रणेशी सातत्याने समन्वय साधत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जादा प्रमाणात इंधन खरेदी करू नये तसेच केवळ आवश्यकतेपुरतेच इंधन भरून घ्यावे. अनावश्यक गर्दीमुळे वाहतूक कोंडी, सार्वजनिक गैरसोय आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पेट्रोल व डिझेल (Petrol-Diesel Shortage) हे अत्यंत ज्वलनशील पदार्थ असल्याने त्यांची साठवण, वाहतूक व हाताळणी ही कायद्याने नियंत्रित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. Petroleum Act 1934 व Petroleum Rules 2002 अंतर्गत नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद असून संबंधित इंधन व भांडी जप्त करण्याचे अधिकार अधिकाऱ्यांना आहेत. नागरिकांनी पेट्रोल पंपांवर बॉटल, प्लास्टिक कॅन किंवा इतर अनधिकृत व असुरक्षित भांड्यांमध्ये पेट्रोल अथवा डिझेल भरण्याची मागणी करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. नियमबाह्य कंटेनरमध्ये इंधन भरणे धोकादायक असून ते कायद्याचे उल्लंघन ठरू शकते, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

तसेच पेट्रोल पंप चालक व कर्मचाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत नियमबाह्य पद्धतीने इंधन वितरण करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. अफवा पसरविणे, कृत्रिम टंचाईची भीती निर्माण करणे, बेकायदेशीर साठेबाजी करणे किंवा सार्वजनिक शिस्त भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही तहसीलदार सौरभ गावंडे यांनी दिला आहे.
अफवा पसरविणाऱ्या व्यक्ती, साठेबाजी किंवा नियमभंगाच्या घटना आढळल्यास तहसील कार्यालय, स्थानिक पोलीस स्टेशन किंवा पुरवठा विभागाशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Related to this topic: