Breaking News
  • हिंगोलीत आरोग्य प्रशासनाचा अनास्थेपना, जिल्ह्यात दाखल झालेल्या तीन शववाहिका धूळखात पडून
  • अमरावती पोलिस अंमलदारच निघाला गुटखा तस्कर; शहर पोलिस दलात खळबळ
  • दुपारी २.३० वाजता पुण्यातील पत्रकार संघात अभिजित दिबके यांची पत्रकार परिषद
  • बुलढाण्यात खडकपूर्णा धरणाच्या पाणीपुरवठा लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • पुण्यातील महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी
  • बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरमध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्या दुपारी चार वाजता कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन
  • पुण्यात उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विद्यापीठाकडून परवानगी
  • पुण्यात बीडीडीएस कडून संपूर्ण पालिका इमारतीचा तपास पूर्ण; बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून महापौर कार्यालय, आयुक्त कार्यालय यासह सगळ्या कार्यालयांची तपासणी

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

मानोरा तालुक्यात मुरुमाची अवैध वाहतूक!

आसोला खुर्दसह इतर गावालगत शासकीय जागेतून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या उत्खनन व वाहतूक सुरू असून महसूल विभागाचे मंडळ अधिकारी व तलाठी याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.


मानोरा तालुक्यात मुरुमाची अवैध वाहतूक

Illegal Mining |

रात्रीच्या अंधारात मुरूम माफियाचा धुमाकूळ

मानोरा (Illegal Mining) : तालुक्यात रतनवाडी, आसोला खुर्दसह इतर गावालगत शासकीय जागेतून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या उत्खनन व वाहतूक सुरू असून महसूल विभागाचे मंडळ अधिकारी व तलाठी याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. ट्रॅक्टरवर जेसीबीच्या मदतीने रात्रीच्या सुमारास मुरूम लंपास करून त्याची अवैध विक्री केली जात असल्याने महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नवीनच रुजू झालेल्या तहसीलदारांनी याकडे लक्ष केंद्रित करून अवैध मुरुम वाहतुकीला आळा घालावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.

मानोरा तालुक्यातील एकूण सहा महसूल मंडळांतील काही गावालगतच्या शासकीय जमिनीवर जेसीबी मशीनच्या सहाय्याने अवैध मुरूम उत्खनन सुरू असल्याचे सांगितले जात आहे. अनेक गावांमधून रात्रीच्या वेळी मुरुमाने भरलेले ट्रॅक्टर रात्रभर धावत असल्याचे चित्र आहे. याची संपूर्ण माहिती मंडळ अधिकारी व तलाठ्यांना असूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने मुरूम माफियांना अभय मिळत असल्याची चर्चा आहे.

काही मुरूम माफिया कमी ब्रासची रॉयल्टी काढून प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त प्रमाणात मुरुमाची वाहतूक करीत असल्यामुळे शासनाच्या महसुलाला लाखो रुपयांचा फटका बसत आहे. यामध्ये मंडळ अधिकारी व तलाठी यांचा चिरीमिरीचा संबंध असल्याने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

महसूल उपविभागीय अधिकारी यांच्या पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परवानगी व उत्खननाची पडताळणी केल्यास मोठे घबाड उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात कोणीही तक्रार केल्यास महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत असल्याचीही नागरिकांची तक्रार आहे.

त्यामुळे रात्रंदिवस सुरू असलेल्या मुरुमाच्या अवैध वाहतुकीवर तातडीने कारवाई करून संबंधित माफियांना पकडावे, अशी मागणी निसर्गप्रेमी नागरिकांमधून होत आहे.

Related to this topic: