Breaking News
  • राम चरणच्या वाढदिवशी चाहत्यांना सरप्राईज; ‘पेड्डी’चा दमदार टीझर प्रदर्शित
  • सावधान!!...नाहीतर देशात लॉकडाऊन लागू होणार?
  • आयपीएल 2026: 'या' 5 दिग्गज खेळाडूंना 'जीरो से हीरो' बनण्याची संधी!
  • आयपीएल 2026: संपूर्ण वेळापत्रक जाहीर, पहिल्याच दिवशी RCB Vs हैदराबाद
  • नेपाळचे नवे पंतप्रधान: बालेन्द्र शाह आज शपथबद्ध
  • डिजिटल मोबाईल अँपच्या माध्यमातून होणार 2027 ची जनगणना
  • महाराष्ट्राचे इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन
  • आता दुचाकीसाठी मिळणार फक्त 200 रुपयांचे पेट्रोल
  • नोरा फतेहीच्या 'सरके चुनरिया' या गाण्याविरोधात सरकारची मोठी कारवाई

होम > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ

मंत्र्यांच्या कार्यक्षेत्रातच सर्वाधीक जुगार अड्डे

जिल्ह्यात अवैद्य धंद्याची रेलचेल वाढत चालली आहे. दुसरीकडे अवैद्य मार्गाने कमविलेल्या पैशातुन उतमात करणारी मंडळी आपले गुन्हेगारीचे प्रस्त वाढविण्यावर भर देत आहे.


मंत्र्यांच्या कार्यक्षेत्रातच सर्वाधीक जुगार अड्डे

खादी व खाकीची मिलीभगत असल्याची चर्चा

यवतमाळ (Illegal Gambling) : जिल्ह्यात अवैद्य धंद्याची रेलचेल वाढत चालली आहे. दुसरीकडे अवैद्य मार्गाने कमविलेल्या पैशातुन उतमात करणारी मंडळी आपले गुन्हेगारीचे प्रस्त वाढविण्यावर भर देत आहे. जिल्ह्यात सर्वाधीक अवैद्य धंदे आदिवासी विकास मंत्री व आदिवासी आमदाराच्या कार्यक्षेत्रातच सुरु आहे. परंतु ते अवैद्य धंदे बंद करण्याकरीता आदिवासी लोक प्रतिनिधी पुढाकार घेत नसल्याने अवैद्य जुगार, मटक्याच्या माध्यमातुन आदिवासी समाजातील खास करुन युवा मुले वाम मार्गाने जात असल्याचे विदारक दृष्य जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.

यवतमाळ जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. येथील मुळ उद्योग शेती आहे. शेतीवर जिल्ह्याचे अर्थचक्र अवलंबुन आहे. याच शेतात राबराब राबुन कष्ट करणार्‍या आदिवासी शेतकर्‍यांची जुगार,मटक्याच्या माध्यमातुन आर्थीक लुट करण्यात येत आहे. व त्यांची हि लुट त्यांनीच निवडुन दिलेले त्यांचे आदिवासी लोक प्रतिनिधी उघड्या डोळयांनी पाहत आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या मतदार संघातील जोडमोहा येथील आंतरराज्यीय जुगार,मटका अड्ड्यावरील पैशाच्या हेराफेरीने सर्वच रेकॉर्ड तोडले आहे.

तेलंगणा,आन्द्रप्रदेश व स्थानिक जुगार्‍यांची (Illegal Gambling) येथे मोठी ’’जत्रा’’ भरत आहे. येथील प्रमुख ’’नाईक’’ ने  ’’खाकी’’ व ’’खादीचे’’ आर्थीक बजेट ’’निर्मल’’ मार्गाने लावल्याची चर्चा आहे. म्हणुनच तर संपुर्ण राज्यभर आदिवासींच्या विकासासाठी त्यांच्या उध्दारासाठी घसा कोरडा करुन ओरडणारे या मतदार संघाचे ’’डॉक्टर’’ अवैद्य धंद्याबाबत ब्र काढण्यास तयार नसावे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील आपल्या कार्यकाळाच्या अंतीम टप्प्यात जिल्हा पोलीस अधिक्षकांनी अवैद्य धंद्याना पाठबळ देण्याकरीता जी ’’टि-२०’’ सुरु केली आहे. त्याने मात्र जिल्ह्यातील सुज्ञ नागरिकांची ’’चिंता’’ वाढविली आहे. जिल्ह्यातील अवैद्य धंद्यामुळेच गुन्हेगारीचा आलेख वाढत चालला आहे. त्यावर ’’चिंता’’ व्यक्त करण्याएैवजी तथा उपाय योजना करण्याएैवजी ग्रामीण भागामध्ये सर्रास जुगार,मटक्यांच्या काउंटरला परवानगी देण्याचे सत्र सुरु करण्यात आले आहे. जोडमोहा सारख्या शांतताप्रिय गावाला अवैद्य जुगार,मटक्यामुळे गालगोट लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

येथे परराज्यातील जुगारी (Illegal Gambling) ठाण मांडुन राहत असल्याने एखाद वेळेस मोठा अनुचित प्रकार घडण्याची सुध्दा शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण तर येथील काही जुगार अड्ड्यावर, जुगार खेळण्याच्या माध्यमातुन दैंनदिनच वाद उपस्थित होत आहे. जुगार अड्ड्यावर सद्या होत असलेले किरकोळ वाद येथे नियुक्त असलेला ’’प्रधान’’ मिटवित आहे. पण त्या लहान,लहान वादातुन मोठी अनुचित घटना घडण्यास वेळ लागणार नाही.

जोडमोह्यात तसे काही घडल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार येथील ’’नाईकास’’ धरण्याची मागणी आता गावातील सुज्ञ नागरिक करीत आहे. जोडमोह्यात जुगार फुलविणारे अट्टल हाफीज, आरीफु, वासु, टोणी, नरेश जे,रंजीत, नरेश यांनी ’’मुख्यालयास’’ जणु आपल्या दावणिला बांधल्या सारखेच दिसत आहे. म्हणुनच तर नेहमीच हजारोच्या जुगार,मटका अड्डयावर धाड मारणार्‍या स्थानिक शाखेने सुध्दा याकडे दुर्लक्ष चालविले आहे. लाखोंची उलाढाल होत असलेल्या जोडमोह्यातील पाठातील ’’चव’’ रे-की करुन चाखत असल्याचे खुद्द पोलीस विभागातुनच चर्चील्या जात आहे. खाकीतील अर्थकारणाने फक्त आदिवासी बहुल जोडमोहा गावालाच टार्गेट केले नसुन त्यांनी आदिवासी मतदार संघातील आर्णीला सुध्दा अवैद्य धंद्याची चटक लावली आहे. येथे सुध्दा जुगार,मटक्याच्या माध्यमातुन आदिवासी नागरिकांच्या होत असलेल्या आर्थीक पिळवणुकीकडे लोक प्रतिनिधीने दुर्लक्ष केले आहे. मात्र आमदाराच्या अर्धागिणीने हा प्रश्न उचलुन धरल्याने आमदारासह त्यांच्या पक्षास घरचाच अहेर मिळाल्याच्या प्रतिक्रीया उमटत आहे.

Related to this topic: