Hingoli Court Examination: हिंगोलीत जिल्हा व सत्र न्यायालयाची लेखी परीक्षा रविवारी संपन्न झाली. परीक्षा २६ एप्रिलला पाच परीक्षा केंद्रात घेण्यात आली, ज्यात चोख पोलिस बंदोबस्त
पोलिसांचा चोख बंदोबस्त
हिंगोली (Hingoli Court Examination) : जिल्हा व सत्र न्यायालयाची लेखी परीक्षा २६ एप्रिल रविवार रोजी हिंगोली शहरातील पाच परीक्षा केंद्रात चोख बंदोबस्तात घेण्यात आली. जिल्हा न्यायालयातील विविध पदासाठी रविवारी लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी ६ हजार ६४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. हिंगोली शहरातील पाच परीक्षा केंद्रावर सकाळी १० ते ११. दुपारी १ ते १.३० त्यानंतर ३ ते ३.३० अशा टप्यामध्ये हि परीक्षा घेण्यात आली.
हिंगोली शहरात भारतीय विद्या मंदिर, पोस्ट ऑफिस रोड येथे बॅच क्रमांक १०४ साठी परीक्षा घेण्यात आली. पोदार इंटर नॅशनल स्कूल येथे बॅच क्रमांक १०४ साठी परीक्षा घेण्यात आली. माणिक स्मारक आर्य विद्यालय बसस्थानका जवळ तसेच सरजुदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालय बसस्थानका जवळ येथे बॅच क्रमांक १ साठी परीक्षा घेण्यात आली. आदर्श एज्यकेशन सोसायटीचे आर्ट, कॉमर्स अन्ड सायन्स कॉलेज अकोला येथे बॅच क्रमांक १ ते ४ साठी परीक्षा घेण्यात आली. या सर्वच केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या सर्वच परीक्षा केंद्रावर भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये जिल्हाधिकारी राहूल गुप्ता यांनी निर्बंध लागू केले होते.