Hingoli Tunnel Andolan: राहुल गुप्ता यांना निवेदन देऊन कयाधू नदीवरील बोगद्याचे काम तात्काळ बंद करण्याची मागणी. आंदोलनाचा आज सहावा दिवस, आमरण उपोषण व ठिय्या आंदोलन सुरू.
जिल्हाधिकारी गुप्ता यांना निवेदन, आंदोलनाचा सहावा दिवस
हिंगोली (Hingoli Tunnel Andolan) : कयाधु नदीवरील होत असलेल्या भूमिगत बोगद्या चे काम तात्काळ बंद करा अन्यथा लवकरच पाणी त्याग आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना १२ एप्रिल रविवार रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आला असून सहाव्या दिवशीही आंदोलन सुरू होते.
याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, कयाधू नदी चोरून जाणारा बोगदा पूर्णतः नियम धाब्यावर बसून जबरदस्तीने काम चालू असून काम बंद करण्यासाठी आमरण उपोषण व आंदोलनाचा आजचा सहावा दिवस असून या आंदोलनाची दखल न घेता काही अधिकारी धमकी देण्याचे व येथे आंदोलन करता येत नाही, तिथे आंदोलन करता येते नाही, अशा धमक्या देत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
संविधानिक मार्गाने रीतसर २४ मार्च २०२६ रोजी मुख्यमंत्री व हिंगोली तालुक्यातील खांबाळा येथे (Hingoli Tunnel Andolan) कयाधू नदी भुमीगत बंधारा रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनस्थळी रविवारी सहभागी झालेले शेतकरी व मान्यवर उपस्थित होते. जलसंपदा मंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत संबंधित जिल्हा प्रशासनाला पत्र देऊन ७ एप्रिल पासून उपोषण व ठिय्या आंदोलन चालू केले असून रविवार आंदोलनाचा सहावा दिवस आहे.
या (Hingoli Tunnel Andolan) आंदोलन तात्काळ दखल घेऊन बोगद्याचे काम बंद करावे नसता, डॉ. शिंदे व प्रल्हाद गवळी अन्नत्याग व पाणी त्याग करून बोगद्या समोरील रस्त्यावर, कधीही, आंदोलन हलवू बोगदा समोरील रस्त्यावर बसणार आहोत, याची नोंद तात्काळ घेण्यात यावी, बोगदा जवळील असलेले सर्व वाहने मशनरी, तात्काळ हलविण्यात यावे, संबंधित गुत्तेदार यांचे माणसे, येऊन आम्हाला धमक्या देत आहेत, आमचा गुत्तेदार खूप मोठा आहे, तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू अशा धमक्या दिल्या जात असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. तात्काळ आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर माजी खा. शिवाजी माने, डॉ. रमेश शिंदे, प्रल्हाद गवळी, दतराव पवार, निवृत काळे, प्रभु पवार, वैजनाथ काळे, रमेश जाधव, शंकर पठाडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.