Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय

हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयातील ३४ कर्मचार्‍यांच्या बदल्या

Hingoli Collectorate: हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात ३४ कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित कर्मचार्‍यांचे समुपदेशन करून बदल्या केल्या.


हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयातील ३४ कर्मचार्‍यांच्या बदल्या

Hingoli Collectorate |


जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करून केल्या बदल्या

हिंगोली (Hingoli Collectorate) : बदली व पदस्थापना २०२६ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी मोठा प्रशासकीय निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार महसूल विभागातील एकूण ३४ कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार, या बदली प्रक्रियेत विविध संवर्गातील कर्मचार्‍यांचा समावेश आहे. 

यामध्ये सहायक महसूल अधिकारी - ७, मंडळ अधिकारी - १२, महसूल सहाय्यक - ६, ग्राम महसूल अधिकारी - ८ आणि शिपाई - १ अशा एकूण ३४ कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान व परिणामकारक व्हावे, तसेच अधिकारी-कर्मचार्‍यांना विविध ठिकाणी काम करण्याची संधी मिळावी या उद्देशाने या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली २०२६ च्या धोरणानुसार कार्यवाही पूर्ण करून सर्व संबंधित कर्मचार्‍यांना त्यांच्या सध्याच्या पदभारातून एकतर्फी कार्यमुक्त करण्यात आले आहे. या बदल्या व पदस्थापना प्रक्रीयेमध्ये संबंधित कर्मचार्‍यांचे समुपदेशन करण्यात आले असुन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित कर्मचार्‍यांना समक्ष बोलावून त्यांच्या अडचणी व मागण्या जाणून घेतल्यानंतरच बदली व पदस्थापना आदेश निर्गमित केले आहेत.

संबंधित तहसील कार्यालये (Hingoli Collectorate) व विभागप्रमुखांना बदली झालेल्या कर्मचार्‍यांना तत्काळ कार्यमुक्त करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर झालेल्या या बदलांमुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह तालुका पातळीवरील महसूल यंत्रणेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, नवीन नियुक्त्या झाल्याने कामांना गती मिळेल व नागरिकांची कामे वेळेत मार्गी लागतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. या बदली आदेशामुळे अनेक कर्मचार्‍यांना नवीन ठिकाणी सेवा बजावण्याची संधी मिळणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व कर्मचार्‍यांना नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले आहे.

Related to this topic: