Breaking News
  • नाणेघाटावर धुक्याची पांढरी चादर; इंद्रवज्र पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
  • रांजणगाव गणपतीजवळ मिक्सर रोडखाली उतरला; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
  • धुळे जिल्ह्यामध्ये असलेल्या एकूण 182 पेट्रोल पंपापैकी जवळपास 9 पेट्रोल पंपांवर डिझेलचा तुटवडा
  • फिसाळलेल्या कुत्र्याने एका सहा वर्षांच्या मुलासह आठ जणांचा चावा घेतल्याची घटना रायगडच्या कर्जतमधून समोर आली आहे
  • सांगोल्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
  • पंढरपूरमध्ये चालत्या एसटी बसची डिझेल टाकी तुटली; एसटी बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
  • बीडमध्ये केज तालुक्यातील जिवाचीवाडी शिवारात रात्री झालेल्या गारपिटीसह वादळी वाऱ्याने शेती पिकांचे नुकसान
  • पुण्यात किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने वार, २ जणांना अटक;पुण्यातील कोंढवा भागातील घटना सी सी टिव्ही मध्ये कैद
  • धाराशिवच्या उमरगा शहरात पावसाची जोरदार हजेरी,अचानक आलेल्या पावसामुळे आठवडी बाजाराचा उडाला फज्जा

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली नगर परिषद

हिंगोली न.प.मध्ये लिलावात वाढले आर्थिक उत्पन्न

Hingoli Municipal Council: हिंगोली नगर परिषदेच्या लिलावात जनावर दाखला फिस, आठवडी व दैनिक बाजार फिसमध्ये वाढले आर्थिक उत्पन्न. मागील वर्षापेक्षा वाढीसह लिलाव संपन्न.


हिंगोली नपमध्ये लिलावात वाढले आर्थिक उत्पन्न

Hingoli Municipal Council |

जनावर दाखला फिस, आठवडी बाजार फिस व दैनिक बाजार फिसचा पार पडला लिलाव

हिंगोली (Hingoli Municipal Council) : नगर परिषद तर्फे सन २०२६-२७ या कालावधी करीता जनावर दाखला फिस, आठवडी बाजार फिस व दैनिक बाजार फिस या बाबत ३० मार्च सोमवार रोजी लिलाव घेण्यात आला. ज्यामध्ये गतवर्षी पेक्षा यंदा आर्थिक उत्पन्न वाढले. 

नगर परिषद (Hingoli Municipal Council) सभागृहात नगराध्यक्षा रेखा श्रीराम बांगर यांच्या अध्यक्षतेखाली लिलावाची प्रक्रिया पार पडली. ज्यामध्ये काही जणांनी सहभाग नोंदवला. त्यात १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीसाठी  जनावर दाखल फिस या लिलावामध्ये ओमप्रकाश शामराव बांगर यांनी अधिकची बोली बोलल्याने ५६५०० रुपयावर बोली सोडण्यात आली. आठवडी बाजारासाठी आशिष दिनकर कुटे यांनी १ लाख ४५ हजाराची सर्वाधिक बोली तर दैनिक बाजार फिस करीता ओमप्रकाश शामराव बांगर यांनी ८ लाख ९४ हजाराची सर्वाधिक बोली बोलल्याने त्यांच्या नावाने तीन वेळा पुकार करून हा लिलाव सोडण्यात आला. मागील वर्षी सन २०२५ - २६ या आर्थिक वर्षाकरीता जनावर दाखल्यासाठी ५१ हजार एवढी रक्कम प्राप्त होती. त्यात यंदा १० टक्के वाढ झाल्याने ५६५०० रुपये एवढी रक्कम प्राप्त झाली.

 आठवडी बाजारासाठी गतवर्षी १०५१०० रुपये होती. त्यात १० टक्के वाढ होऊन १ लाख ४५ हजार व दैनिक  बाजार फिस साठी गतवर्षी ७ लाख ९९ हजार तर यंदा १० टक्के वाढ झाल्याने पालिकेला ८ लाख ९४ हजाराचे उत्पन्न होणार. या (Hingoli Municipal Council) लिलावास गटनेते श्रीराम बांगर, उपाध्यक्ष अ.माबुद बागवान यांच्यासह नगरसेवकांची उपस्थिती होती.

Related to this topic: