Breaking News
  • हिंगोलीत आरोग्य प्रशासनाचा अनास्थेपना, जिल्ह्यात दाखल झालेल्या तीन शववाहिका धूळखात पडून
  • अमरावती पोलिस अंमलदारच निघाला गुटखा तस्कर; शहर पोलिस दलात खळबळ
  • दुपारी २.३० वाजता पुण्यातील पत्रकार संघात अभिजित दिबके यांची पत्रकार परिषद
  • बुलढाण्यात खडकपूर्णा धरणाच्या पाणीपुरवठा लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • पुण्यातील महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी
  • बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरमध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्या दुपारी चार वाजता कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन
  • पुण्यात उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विद्यापीठाकडून परवानगी
  • पुण्यात बीडीडीएस कडून संपूर्ण पालिका इमारतीचा तपास पूर्ण; बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून महापौर कार्यालय, आयुक्त कार्यालय यासह सगळ्या कार्यालयांची तपासणी

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली डीआयजी शहाजी उमाप

डीआयजी शहाजी उमाप हिंगोली दौऱ्यावर; पोलिसांच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब, नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ तोडगा

Hingoli DIG Shahaji Umap: नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक  शहाजी उमाप यांनी 27 मे बुधवार रोजी हिंगोली जिल्हा पोलीस मुख्यालयास भेट देऊन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.


डीआयजी शहाजी उमाप हिंगोली दौऱ्यावर पोलिसांच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ तोडगा

Hingoli DIG Shahaji Umap |

हिंगोली (Hingoli DIG Shahaji Umap) : नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक  शहाजी उमाप यांनी 27 मे बुधवार रोजी हिंगोली जिल्हा पोलीस मुख्यालयास भेट देऊन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. मासिक गुन्हे आढावा बैठकीत त्यांनी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार व शाखाप्रमुखांना मार्गदर्शन केले. 

पोलीस स्टेशन पातळीवर काम करताना येणाऱ्या अडचणी अधिकाऱ्यांनी नि:संकोचपणे मांडाव्यात, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले. जिल्ह्यातील गुन्हे निर्गतीचा वेग, कायदा-सुव्यवस्था आणि पोलीस दलाच्या एकूण कामकाजावर त्यांनी समाधान व्यक्त केले. गुन्हे प्रतिबंध व तपास याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी केलेल्या कामाचे त्यांनी विशेष कौतुक केले आणि भविष्यात अधिक प्रभावीपणे काम करण्याच्या सूचना दिल्या. 

दुपारच्या सत्रात डीआयजी उमाप यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून आपल्या अडीअडचणी मांडल्या. डीआयजींनी त्या जागेवरच संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले. नागरिकांच्या प्रश्नांना त्वरित प्रतिसाद मिळाल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. 

या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजकुमार केंद्रे, श्री. कुंदन कुमार वाघमारे, प्रशिक्षणार्थी पोलीस उप अधीक्षक श्री. मयूर रसाळ, होम डिवायएसपी श्री. दत्ता केंद्रे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व ठाणेदार व शाखाप्रमुख उपस्थित होते.