Breaking News
  • वाढत्या पेट्रोल दरांचा परिणाम? पेट्रोल चोरीच्या घटनांत वाढ
  • पश्चिम नागपुरात वारंवारच्या लोडशेडिंगने विरोधात कॉंग्रेसकडून मुख्य विद्युत भवन कार्यालयात जोरदार आंदोलन
  • पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथे महिलेचा धारधार शास्त्राने वार करून खून
  • इंदापूर तालुक्यातील प्रश्न पेटला, कृषिमंत्री निघून गेल्यानंतरही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच
  • नंदुरबार बाजार पेठेत गवारची आवक वाढल्याने गवारचे दर अचानक घसरले
  • कल्याणच्या दुर्गाडी मंदिर प्रवेशबंदीच्या मुद्द्यावर कल्याणमध्ये राजकारण तापले
  • शिवसेनेचा पुणे महानगरपालिकेवर हल्लाबोल मोर्चा
  • नीट पेपरफुटी प्रकरण; पुण्यातील आणखी प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर?
  • नाणेघाटावर धुक्याची पांढरी चादर; इंद्रवज्र पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली गुन्हा दाखल

हिंगोलीच्या बेरोजगार तरुणांच्या स्वप्नांचा सौदा: बसस्थानकावर झालेली ओळख ठरली ६.२१ लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

Hingoli case registered: पंचायत समितीत आऊटसोर्सिंग द्वारे नोकरी लावतो, असे सांगून संगणक प्रशिक्षण केंद्र चालकासह तीन जणांची ६.२१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार


हिंगोलीच्या बेरोजगार तरुणांच्या स्वप्नांचा सौदा बसस्थानकावर झालेली ओळख ठरली ६२१ लाखांची फसवणूक गुन्हा दाखल

Hingoli case registered |

हिंगोली (Hingoli case registered) : पंचायत समितीत आऊटसोर्सिंग द्वारे नोकरी लावतो, असे सांगून संगणक प्रशिक्षण केंद्र चालकासह तीन जणांची ६.२१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलाला आणि ओळखीच्या दोघांना सरकारी नोकरीचे स्वप्न दाखवून नागपूरच्या दोन भामट्यांनी तब्बल दीड वर्ष पैशांचा अपहार केला. अखेर वर्षभर रुजू आदेशाची वाट पाहून कंटाळलेल्या शरद मोहारे यांनी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली असून मंगळवारी  २६ मे रोजी रात्री उशिरा दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरात (Hingoli case registered) संगणक प्रशिक्षण केंद्र चालवणारे शरद मोहारे यांची दोन वर्षांपूर्वी हिंगोली बसस्थानकावर नागपूर येथील अ‍ॅडराईट मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे विरेंद्र सुरेश वाटकर आणि जगदिश किरणराव राऊत रा. हिंगणा रोड नागपूर यांच्याशी ओळख झाली. गप्पांच्या ओघात वाटकर व राऊत यांनी आऊटसोर्सिंग मधून सरकारी नोकर्‍या निघाल्या असून ओळखीचे कोणी असेल तर लगेच रुजू आदेश काढून देतो, असे मोहारे यांना सांगितले. त्यावर मोहारे यांनी स्वतःच्या मुलासह इतर दोघांसाठी विचारणा केली.

आरोपींनी हिंगोली पंचायत समितीच्या रोजगार हमी योजनेत टंकलेखक, पर्यवेक्षक व अन्य एक अशा तीन जागांवर नियुक्तीचे आमिष दाखवले. त्यासाठी पैशांची मागणी करत मोहारे यांच्याकडून ३१ मार्च ते २० ऑक्टोबर २०२४ या कालावधीत टप्प्याटप्प्याने ऑनलाईन पद्धतीने एकूण ६.२१ लाख रुपये उकळले. पैसे देऊनही महिनोनमहिने नियुक्तीचे आदेश न मिळाल्याने मोहारे यांनी वारंवार वाटकर व राऊत यांच्याकडे पाठपुरावा केला. प्रत्येक वेळी लवकरच आदेश मिळतील असे सांगून आरोपींनी वर्षभर टोलवाटोलवी केली.

आदेशही नाही आणि पैसे परतही नाही, हे लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याची खात्री मोहारे यांना पटली. त्यांनी पैशांची मागणी करताच आरोपींनी पैसे देण्यासही टाळाटाळ सुरू केली. अखेर शरद मोहारे यांनी मंगळवारी  २६ मे रोजी रात्री हिंगोली शहर पोलिस ठाणे गाठले आणि विरेंद्र वाटकर व जगदिश राऊत यांच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक संदीप मोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के, जमादार अशोक धामणे पुढील तपास करीत आहेत.