Breaking News
  • नाणेघाटावर धुक्याची पांढरी चादर; इंद्रवज्र पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
  • रांजणगाव गणपतीजवळ मिक्सर रोडखाली उतरला; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
  • धुळे जिल्ह्यामध्ये असलेल्या एकूण 182 पेट्रोल पंपापैकी जवळपास 9 पेट्रोल पंपांवर डिझेलचा तुटवडा
  • फिसाळलेल्या कुत्र्याने एका सहा वर्षांच्या मुलासह आठ जणांचा चावा घेतल्याची घटना रायगडच्या कर्जतमधून समोर आली आहे
  • सांगोल्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
  • पंढरपूरमध्ये चालत्या एसटी बसची डिझेल टाकी तुटली; एसटी बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
  • बीडमध्ये केज तालुक्यातील जिवाचीवाडी शिवारात रात्री झालेल्या गारपिटीसह वादळी वाऱ्याने शेती पिकांचे नुकसान
  • पुण्यात किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने वार, २ जणांना अटक;पुण्यातील कोंढवा भागातील घटना सी सी टिव्ही मध्ये कैद
  • धाराशिवच्या उमरगा शहरात पावसाची जोरदार हजेरी,अचानक आलेल्या पावसामुळे आठवडी बाजाराचा उडाला फज्जा

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

गॅस सिलेंडर पुरवठा

व्यवसायीक गॅस सिलेंडरची मागणी अधिक; पुरवठा कमी

Gas Cylinders Supply: हिंगोलीमध्ये व्यवसायीक गॅस सिलेंडरची मागणी वाढत असताना पुरवठा कमी झाल्याने अनेक हॉटेल व ढाबे अडचणीत. जिल्हा पुरवठा अधिकारीने आढावा घेतला.


व्यवसायीक गॅस सिलेंडरची मागणी अधिक पुरवठा कमी

Gas Cylinders Supply |

जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील यांनी गॅस एजन्सीवर भेट देऊन घेतला आढावा

हिंगोली (Gas Cylinders Supply) : आखातीमधील युध्दाचा अद्यापही भडका कायम आहे. त्यामुळे अधून मधून इंधनात तुटवडा निर्माण होत आहे. व्यवसायीकांना लागणार्‍या सिलेंडरची मागणी अधिक वाढली असताना सिलेंडरचा पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे अनेक हॉटेल, ढाबे आदी व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर आखाती मधील युध्द अद्यापही संपले नाही. या युध्दजन्य परिस्थितीमुळे (Gas Cylinders Supply) गॅस पुरवठ्यावर त्याचा परिणाम जाणवत आहे. हॉटेल, धाबे, खानावळ आदींसाठी व्यवसायिक सिलेंडर ही बाब अत्यावश्यक आहे. हिंगोली शहरामध्ये हिंदूस्तान पेट्रोलियम गॅस एजन्सीकडे १४९ व्यवसायीक गॅस धारकांची नोंदणी आहे. आज परिस्थिीतमध्ये त्या ठिकाणी ३१ गॅस सिलेंडर उपलब्ध आहेत. त्याच प्रमाणे भारत पेट्रोलियम गॅस एजन्सीकडे २२८ गॅस धारकांची नोंदणी असुन आज परिस्थितीत त्यांच्याकडे ३५ गॅस सिलेंडर उपलब्ध आहेत. या दोन एजन्सीकडे मिळवून ६६ गॅस सिलेंडर उपलब्ध आहेत.

विशेष म्हणजे व्यवसायीक सिलेंडरची (Gas Cylinders Supply) मागणी अधिक वाढली असताना पुरवठा मात्र अत्यल्प होत आहे. उपलब्ध असलेले गॅस सिलेंडर हे शासकीय वसतीगृहासह अत्यावश्यक ठिकाणी उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. हिंगोली शहरात व्यवसायीक गॅस सिलेंडरच्या तुटवड्याच्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील यांच्यासह पथकाने १ एप्रिल रोजी गॅस एजन्सीवर जाऊन प्रत्यक्ष उपलब्ध असलेले गॅस सिलेंडर व ग्राहकाकडून किती मागणी झाली या बाबतचा सविस्तर आढावा घेऊन काही मार्गदर्शक सूचनाही दिल्या.

Related to this topic: