Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

गडचिरोली बंगाली बांधव

गडचिरोलीतील बंगाली बांधवांच्या मागण्यांसह घोट येथे अप्पर तहसील कार्यालयासाठी महसूल मंत्र्यांकडे पाठपुरावा

Gadchiroli Bengali People: गडचिरोलीतील घोट येथे बंगाली समाजाचे प्रतिनिधी आणि आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांचे नेतृत्वात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील अनेक मागण्यांवर पाठपुरावा


गडचिरोलीतील बंगाली बांधवांच्या मागण्यांसह घोट येथे अप्पर तहसील कार्यालयासाठी महसूल मंत्र्यांकडे पाठपुरावा

Gadchiroli Bengali People |

घोट (Gadchiroli Bengali People) : गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या नेतृत्वात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथे भेट घेऊन विविध महत्त्वपूर्ण मागण्यांबाबत पाठपुरावा करण्यात आला. यावेळी घोट परिसरातील प्रमुख कार्यकर्ते तसेच बंगाली समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. चामोर्शी तालुक्यातील सुमारे एक लाख लोकसंख्या असलेल्या घोट परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी घोट येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय तात्काळ मंजूर करण्याची मागणी करण्यात आली.

तसेच गडचिरोली जिल्ह्यातील ४८ बंगाली गावांच्या (Gadchiroli Bengali People) विकासासाठी विशेष आर्थिक तरतूद करणे, पुनर्वसित बंगाली बांधवांच्या वर्ग-२ शेतजमिनींचे विनामूल्य वर्ग-१ मध्ये रूपांतर करून मालकी हक्क प्रदान करणे आणि क्षेत्रातील ८२ नवीन तलाठी कार्यालयांच्या इमारतींसाठी निधी उपलब्ध करून देणे या मागण्यांवरही सविस्तर चर्चा झाली. महसूल मंत्री बावनकुळे यांनी या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत शासनस्तरावर आवश्यक कार्यवाही करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.

गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या न्याय्य मागण्यांसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी सामूहिक प्रयत्न व पाठपुरावा यापुढेही सुरू राहणार असल्याचे यावेळी उपस्थित प्रतिनिधींनी सांगितले.याप्रसंगी घोट परिसरातील माजी पोलीस पाटील अविनाश वडेटीवार, आसिफ सय्यद, दिनकर लाकडे, गिरीश उपाध्ये, बाबुराव भोवरे, हेमंत उपाध्ये, बबलू शहा, बंडू भांडेकर, दीपक हलदर, सतीश राय, अनिता राय, शिल्पा राय यांच्यासह बंगाली समाजाचे प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related to this topic: