Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

कॉकरोच जनता पार्टीवर शासनाचा ‘हिट’

सोशल मीडियावर केवळ एका आठवड्यात भारतातील सर्वात मोठा डिजिटल ट्रेंड ठरलेल्या “कॉकरोच जनता पार्टी”ला केंद्र सरकारने मोठा धक्का दिला आहे.


कॉकरोच जनता पार्टीवर शासनाचा ‘हिट’

Cockroach Janata Party |

अधिकृत वेबसाईट भारतात बंद; संस्थापक अभिजीत दीपके कडाडले

हिंगोली (Cockroach Janata Party) : सोशल मीडियावर केवळ एका आठवड्यात भारतातील सर्वात मोठा डिजिटल ट्रेंड ठरलेल्या “कॉकरोच जनता पार्टी”ला केंद्र सरकारने मोठा धक्का दिला आहे. या व्यंग्यात्मक आणि डिजिटल राजकीय पक्षाची अधिकृत वेबसाईट भारतात पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. यापूर्वी पक्षाचे अधिकृत ‘X’ (ट्विटर) आणि इन्स्टाग्राम अकाउंटवरही कारवाई करण्यात आली होती.

तुफान फॉलोअर्स आणि ऑनलाईन मेंबरशिप

ही वेबसाईट आणि सोशल मीडिया अकाउंट्स बंद होण्यापूर्वी कॉकरोच जनता पार्टीने लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले होते. पक्षाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तब्बल २.१७ कोटींहून अधिक (२१.७ मिलियन) फॉलोअर्स झाले होते, ज्यामध्ये त्यांनी सत्ताधारी भाजपच्या अधिकृत हँडललाही मागे टाकले होते. तर त्यांच्या X (ट्विटर) अकाउंटवर १ लाख ६० हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स होते.

या पक्षाची ऑनलाईन मेंबरशिप घेण्यासाठी तरुणांनी प्रचंड गर्दी केली होती. अधिकृत वेबसाईट बंद होण्यापूर्वी भारतातील तब्बल १० लाख (१ मिलियन) लोकांनी या पक्षाची ऑनलाईन सदस्य म्हणून नोंदणी केली होती. धक्कादायक म्हणजे, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी याच वेबसाईटवरून चालवल्या गेलेल्या ऑनलाईन याचिकेवर ६ लाख लोकांनी सह्या केल्या होत्या.

“सरकार झुरळांना इतके का घाबरत आहे?”

पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी माध्यमांशी बोलताना सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “हा सरकारचा निव्वळ हुकूमशाही कारभार आहे,” असा आरोप त्यांनी केला.

दीपके म्हणाले, “पहिले त्यांनी आमचे सोशल मीडिया अकाउंट्स हॅक करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात अपयश आल्यावर आता थेट वेबसाईटच बंद पाडली. सरकार झुरळांना (कॉकरोच) इतके का घाबरत आहे? आमचा गुन्हा फक्त एवढाच होता की आम्ही शिक्षण व्यवस्थेतील गोंधळावर उत्तरदायित्व मागत होतो आणि देशातील तरुणांच्या चांगल्या भविष्याची मागणी करत होतो.”

तसेच त्यांनी तरुणांना धीर देत, “तुम्ही आम्हाला इतक्या सहजासहजी संपवू शकत नाही. आम्ही आमच्या नवीन डिजिटल घराचे काम करत आहोत. कॉकरोच कधीच मरत नाहीत,” असा इशाराही सरकारला दिला.

या कारवाईमुळे सोशल मीडियावरील झेन जी आणि तरुणांमध्ये सरकारविरोधात संतापाची लाट पसरल्याचे बोलले जात आहे.

Related to this topic: