Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

सीएनजी ट्रक अपघात

परभणीत सीएनजी वाहतुक करणारा ट्रक अपघातात उलटला..

CNG truck accident: सीएनजी ट्रक चालकाच्या झोपेच्या डुलकीमुळे राज्य महामार्गावर अपघात झाला. वाहन ३३ केव्ही विद्युत वाहिनीच्या पोलला धडकले, परभणी तालुक्यात


परभणीत सीएनजी वाहतुक करणारा ट्रक अपघातात उलटला

CNG truck accident |

 

३ केव्ही विद्युत पोलला धडक; मोठा अनर्थ टळला

परभणी (CNG truck accident) : पाथरी तालुक्यातील राज्य महामार्ग ६१ वर पोहेटाकळी गावाजवळ सोमवारी मध्यरात्री सीएनजी वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रक वाहनाचा अपघात झाला. चालकाला झोपेची डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून आयशर थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या महावितरणच्या ३३ केव्ही विद्युत वाहिनीच्या पोलला जाऊन धडकले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार एमएच ४३ बीएक्स २३४४ क्रमांकाचे  आयशर ट्रक सीएनजी इंधन घेऊन हुमनाबाद (कर्नाटक) येथून पाथरी येथील हर्षवर्धन पेट्रोल पंपाकडे येत होते. सोमवार २५ मे रोजी रात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास पोहेटाकळी गावाजवळ चालक अभिजीत माधव कानवटे  याला झोपेची डुलकी लागल्याने वाहन रस्त्याच्या बाजूला जाऊन ३३ केव्ही उपकेंद्रांना विद्युत पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या पोलला धडकले. धडकेनंतर वाहन रस्त्याच्या कडेला उलटून पडले.

अपघाताची माहिती मिळताच सपोनि पंकज शिनगारे यांच्यासह महामार्ग पोलिसांनी (CNG truck accident) घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी व पंचनामा केला. ज्या ३३  केव्ही विद्युत वाहिनीच्या पोलला सीएनजी इंधन असलेले ट्रक धडकले त्या वाहिनीची तार तुटुन वाहनावर पडली असती तर आजुबाजुला घरे असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. सुदैवाने तसे घडले नाही .