Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

घाटनांद्रा येथे होणारा बालविवाह प्रशासनाने रोखला

महिला व बाल विकास विभागांतर्गत कार्यरत चाईल्ड हेल्पलाईन बुलढाणा, जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसेच रायपूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईत घाटनांद्रा येथे होणारा बालविवाह रोखण्यातप्रशासनाला यश आले आहे.


घाटनांद्रा येथे होणारा बालविवाह प्रशासनाने रोखला

Child Marriage |

महिला व बाल विकास विभाग, चाईल्ड हेल्पलाईन आणि रायपूर पोलिसांची संयुक्त धडक कारवाई

बुलढाणा (Child Marriage) : महिला व बाल विकास विभागांतर्गत कार्यरत चाईल्ड हेल्पलाईन बुलढाणा, जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसेच रायपूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईत घाटनांद्रा (ता. जि. बुलढाणा) येथे होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा बालविवाहाच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले गेले आहे.

माहितीनुसार, दि. २१ मे २०२६ रोजी रायपूर पोलीस स्टेशनला घाटनांद्रा येथे एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची गोपनीय तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत रायपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश सांगेकर यांनी तत्काळ चाईल्ड हेल्पलाईन बुलढाणा व जिल्हा बाल संरक्षण कक्षाशी संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली.

त्यानंतर पोलिस कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी वैशाली जाधव यांनी तातडीने घाटनांद्रा येथे जाऊन संबंधित मुलीच्या घरी भेट दिली. यावेळी चाईल्ड हेल्पलाईन बुलढाणा प्रकल्प समन्वयक शेख सोहेल यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिंगुळे तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिनेश मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू केली.

या प्रकरणात ग्राम बाल संरक्षण समिती, बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, ग्रामसेवक आणि रायपूर पोलीस यांच्या समन्वयातून संबंधित कुटुंबीयांचे समुपदेशन करण्यात आले. अल्पवयीन मुलीचा विवाह करणे हा कायद्याने गुन्हा असल्याची जाणीव करून देण्यात आली. तसेच बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि भवितव्यावर होणारे दुष्परिणामही समजावून सांगण्यात आले.

प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे संबंधित बालविवाह तात्काळ थांबविण्यात आला. यानंतर बालकल्याण समिती, बुलढाणा यांच्या आदेशानुसार संबंधित मुलीला पुढील संरक्षणात्मक कार्यवाहीसाठी शासकीय बालिका गृह, बुलढाणा येथे दाखल करण्यात आले.

दरम्यान, बालकल्याण समितीच्या सदस्यांनी मुलीची समुपदेशनात्मक मुलाखत घेतली. जिल्हा बाल संरक्षण कक्षातील समुपदेशकांनी मुलीला शिक्षणाचे महत्त्व, बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि तिच्या अधिकारांविषयी माहिती देत मार्गदर्शन केले.

घाटनांद्रा येथे होणारा बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले असून महिला व बाल विकास विभाग, चाईल्ड हेल्पलाईन आणि रायपूर पोलिसांच्या तत्पर कारवाईचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी बुलढाणा दिनेश मराठे यांनी दिली.

Related to this topic: