Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

चिखली तालुका क्रीडा संकुलाच्या विकासाला गती; आमदार श्वेता महाले पाटील यांचा पुढाकार

बैठकीत क्रीडा संकुलाच्या विकासासंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय सर्वानुमते घेण्यात आले.


चिखली तालुका क्रीडा संकुलाच्या विकासाला गती आमदार श्वेता महाले पाटील यांचा पुढाकार

Chikhli Sports Complex |

चिखली (Chikhli Sports Complex) : चिखली विधानसभा मतदारसंघातील युवा खेळाडूंना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या पुढाकाराने दि. २२ मे २०२६ रोजी तालुका क्रीडा संकुल समितीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत क्रीडा संकुलाच्या विकासासंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय सर्वानुमते घेण्यात आले.

बैठकीत नवीन बहुउद्देशीय हॉलचे बांधकाम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला. तसेच जुन्या बहुउद्देशीय हॉलच्या दुरुस्ती व नूतनीकरणाच्या कामालाही लवकरच सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नवीन बॅडमिंटन हॉलमध्ये वीज जोडणी आणि प्रकाश व्यवस्था करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत शाखेकडे सोपविण्यात आली आहे.

याशिवाय जलतरण तलाव आणि टर्फ क्रिकेट मैदान हे यापुढे कंत्राटी पद्धतीने भाडेतत्त्वावर चालविण्यात येणार असून त्यामुळे या सुविधा नियमित व सुस्थितीत सुरू राहतील, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.

क्रीडा संकुलाची देखभाल आणि दुरुस्ती सुरळीत व्हावी यासाठी चौकीदार आणि शिपाई नियुक्तीच्या मानधनालाही बैठकीत मंजुरी देण्यात आली.

यावेळी आमदार श्वेता महाले पाटील म्हणाल्या, “मतदारसंघातील खेळाडूंना चिखलीतच दर्जेदार सुविधा मिळाव्यात आणि सरावासाठी बाहेर जाण्याची गरज भासू नये, यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे. आपल्या भागातील प्रतिभावान युवा खेळाडूंना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि क्रीडा क्षेत्राला चालना मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.”

मतदारसंघातील युवा प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आमदार महाले पाटील यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे फलित या निर्णयांच्या माध्यमातून दिसून येत आहे.

या बैठकीस जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. भक्ती आंब्रे, तालुका क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर, अप्पर तहसीलदार सौरभ गावंडे, नायब तहसीलदार मुरली गायकवाड, ठाणेदार भूषण गावंडे, मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, गटविकास अधिकारी समाधान वाघ तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. कड उपस्थित होते.

Related to this topic: