SIR Process: एस आय आर प्रक्रियेसाठी नियुक्त केलेले बीएलओ हे आपल्या कामांमध्ये कामचुकारपणा करत आहेत ते प्रत्यक्ष घरोघरी पोहोचत नसून घरबसल्या फोनवर सदर प्रक्रिया करत आहे.
मतदार नोंदणी अधिकारीकडे तक्रार
रिसोड (SIR Process) : SIR प्रक्रियेसाठी नियुक्त केलेले बीएलओ हे आपल्या कामांमध्ये कामचुकारपणा करत आहेत ते प्रत्यक्ष घरोघरी पोहोचत नसून घरबसल्या फोनवर सदर प्रक्रिया करत आहे. यामध्ये सामान्य मतदारांची कुचंबना होत आहे. सामान्य मतदार पर्यंत सदर BLO पोहोचत नसून ते त्यांच्या कामचुकारपणामुळे असंख्य मतदार हे मतदारांपासून वंचित राहण्याची भीती आहे. यामुळे सदर प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून कामचुकार BLO ना ताकीद करण्यात यावी जेणेकरून सदर काम काळजीपूर्वक करतील अशी तक्रार माजी नगरसेवक फय्याज अहमद यांनी मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे दिनांक 27 मार्च रोजी केली आहे.
तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, रिसोड शहरा मध्ये मतदार SIR प्रकिया नुसार नोंदणी सुरु आहे. त्या अनुषंगाने नगर परिषद रिसोड मध्ये तहसीलदार यांनी राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व नगर सेवक यांना सोबत घेऊन दि. २४/०३/२०२६ रोजी नगर परिषदेच्या संभागृहा मध्ये मिटिंग आयोजित करण्यात आलेली होती. त्या मिटिंग मध्ये तहसीलदार रिसोड यांनी आहावान केला होता कि बि एल ओ ला आपल्या परिसरा मध्ये राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व नगर सेवक यांना सोबत घेऊन नागरीकांन मदत करावी असे अहवान करण्यात आले होते.
तरी रिसोड शहरा मध्ये काही BLO आपले काम करतच नाही त्या मध्ये यादी क्रमांक २८७ नंदाकुले, २८४ पुस्लेकर व ३०२ बोरकर मैडम, ३०६ खनपट्टे हे चार ही BLOआपले काम करीत नाही या मुळे नागरीकांना बर्याच प्रकारे त्रास सहन करावा लागत आहे व यांच्या या कार्य मुळे नागरिक या नोंदणी प्रकियेतून वंचित राहावे लागत आहे. तरी या विषयाकडे लक्ष घालून सदर BLO ना SIR प्रक्रिया योग्यरीत्या करण्यास संबंधित आदेशित करावे असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यावेळी प्रा विजय तुरुकमाने, गजानन निखाते,साजिद खान, तारीक खान, युसुफ मंसुरी, मोहम्मद जमील,आदी उपस्थित होते.