Zilla Parishad School: अमरावती जिल्ह्यातील आठ शाळांना 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा' योजनेअंतर्गत सुविधा देण्यास समावेश करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेत समावेश;पाच तालुक्यातील शाळांना प्राधान्य
अमरावती (Zilla Parishad School) : राज्यातील शासकीय शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा' योजनेच्या पुढील टप्प्यात अमरावती जिल्ह्यातील तब्बल ८ शाळांची निवड करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने २७ मार्च २०२६ रोजी यासंदर्भात शासन निर्णय जाहीर केला. राज्यातील एकूण ४०५ शाळांना (Zilla Parishad School) या टप्यात आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यास मंजुरी देण्यात आली असून, त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शाळांचा समावेश आहे.
अमरावती जिल्ह्यात चांदुर बाजार, मोर्शी, वरुड, चांदुर रेल्वे, अमरावती, मनपा अम या तालुक्यांतील शाळांना प्राधान्य देण्यात आले आहे. या (Zilla Parishad School) शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देताना पायाभूत सुविधा, स्वच्छतागृह, पिण्याचे शुद्ध पाणी, डिजिटल शिक्षण साधने तसेच विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र 'पिंक रूम'ची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात एक शाळा 'क्रीडा प्रबोधिनी' म्हणून विकसित करण्याचे धोरण शासनाने स्वीकारले असून,अमरावती जिल्ह्यातही या अंतर्गत क्रीडा सुविधा वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
'पिंक रूम' म्हणजे काय?
शाळांमध्ये इयत्ता सातवीपासूनच्या पुढील मुलींसाठी स्वतंत्र, सुरक्षित व सुसज्ज विश्रांती कक्ष, मासिक पाळीदरम्यान स्वच्छता व आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुविधा, सॅनिटरी नॅपकिन, डिस्पोजल यंत्रणा व स्वच्छ पाण्याची उपल उपलब्धता, मुलींमध्ये आत्मविश्वास वाढविणे व शाळेत उपस्थिती टिकविण्यावर भर देण्यात येणार आहे.
क्रीडा प्रबोधिनी संकल्पना या योजनेअंतर्गत प्रत्येक (Zilla Parishad School) जिल्ह्यातील शाळांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी स्वतंत्र नियोजन आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निधी उपलब्ध करून देत टप्प्याटप्प्याने कामे पूर्ण केली जाणार आहेत. दरम्यान, या निर्णयामुळे अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्लक्षित भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल अपेक्षित आहे.
- योजनेतून मिळणाऱ्या सुविधा
- इयत्ता १ ते १० पर्यंत शिक्षणाची सोय
- आधुनिक वर्गखोल्या व डिजिटल शिक्षण
- मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह
- शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
- विद्यार्थिनींसाठी 'पिंक रूम'
या शाळांचा समावेश
जि.प.शाळा (Zilla Parishad School) कारंजा बहीरम चांदुर बाजार, खेड मोर्शी, गव्हाणकुंड वरुड, नेरपिंगराई मोर्शी, माहुली जहागीरी अमरावती,शिरजगाव कसबा चांदुर बाजार, तसेच शासकीय विद्यानिकेतन मनपा अम.व झेडपी हायस्कूल चांदुर रेल्वे या शाळांचा समावेश आहे.
दर्जेदार शिक्षणाची संधी
दरम्यान, या निर्णयामुळे अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्लक्षित भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार असून शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. स्थानिक प्रशासनाने योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत
शासनाच्या या निर्णयाचे (Zilla Parishad School) प्राथमिक शिक्षक समितीने स्वागत केले आहे. पण या प्रमाणे इतर शाळेचा सुध्दा विकास करावा तसेच भौतिक सुविधा पुरवण्यात याव्यात यामुळे ग्रामिण भागातील जिल्हा परिषद शाळा टिकतील आणि ग्रामिण भागातील विद्यार्थी दर्जेदार, सुविधा असल्याचा लाभ घेतिल आणि पालकाचा ओढा वाढेल, पटसंख्या वाढेल अशी अपेक्षा आहे.
- राजेश सावरकर, राज्य प्रसिध्दी प्रमुख, म. रा. प्राथमिक शिक्षक समिती