Breaking News
  • नाणेघाटावर धुक्याची पांढरी चादर; इंद्रवज्र पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
  • रांजणगाव गणपतीजवळ मिक्सर रोडखाली उतरला; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
  • धुळे जिल्ह्यामध्ये असलेल्या एकूण 182 पेट्रोल पंपापैकी जवळपास 9 पेट्रोल पंपांवर डिझेलचा तुटवडा
  • फिसाळलेल्या कुत्र्याने एका सहा वर्षांच्या मुलासह आठ जणांचा चावा घेतल्याची घटना रायगडच्या कर्जतमधून समोर आली आहे
  • सांगोल्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
  • पंढरपूरमध्ये चालत्या एसटी बसची डिझेल टाकी तुटली; एसटी बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
  • बीडमध्ये केज तालुक्यातील जिवाचीवाडी शिवारात रात्री झालेल्या गारपिटीसह वादळी वाऱ्याने शेती पिकांचे नुकसान
  • पुण्यात किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने वार, २ जणांना अटक;पुण्यातील कोंढवा भागातील घटना सी सी टिव्ही मध्ये कैद
  • धाराशिवच्या उमरगा शहरात पावसाची जोरदार हजेरी,अचानक आलेल्या पावसामुळे आठवडी बाजाराचा उडाला फज्जा

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

अकोला सभागृह गोंधळ

अकोला सभागृहात गोंधळ प्रकरणी 16 नगरसेवक निलंबित

अकोला महानगरपालिकेच्या सभेत गोंधळानंतर 16 नगरसेवक निलंबित; विरोधकांचा आंदोलनाचा इशारा जारी, राजकीय तणाव वाढला.


अकोला सभागृहात गोंधळ प्रकरणी 16 नगरसेवक निलंबित

‘५० खोके एकदम ओके’ घोषणेमुळे सभागृह दणाणले
निलंबन मागे न घेतल्यास विरोधकांचा आंदोलनाचा इशारा


अकोला : महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत झालेल्या गदारोळानंतर निलंबित करण्यात आलेल्या १६ नगरसेवकांच्या निलंबनावर माघार घेण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती पुढे आली आहे. या घडामोडींमुळे सत्ताधारी व विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

३० मार्च रोजी झालेल्या सभेत शहराच्या अर्थसंकल्पावर चर्चा अपेक्षित होती. मात्र, सुरुवातीलाच ‘५० खोके एकदम ओके’ या घोषणेमुळे वातावरण तापले. घोषणाबाजी वाढत गेल्याने सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाला आणि सत्ताधारी व विरोधक आमनेसामने आले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले.

गोंधळ शांत न झाल्याने महापौर शारदा खेडकर यांनी कठोर भूमिका घेत विरोधी गटातील १६ नगरसेवकांना तीन सभांसाठी निलंबित करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर विरोधक अधिक आक्रमक झाले आणि महापौरांसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. परिणामी, सभेचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आणि शहराच्या विकासासाठी महत्त्वाचा असलेला अर्थसंकल्प चर्चेविना राहिला.

दरम्यान, निलंबनाचा निर्णय मागे घेण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत असून, याबाबत राजकीय हालचालींना वेग आला आहे. विरोधी गटाने निलंबन मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

या संपूर्ण प्रकारामुळे अकोल्यातील राजकीय वातावरण तापले असून, विकासाच्या मुद्द्यांऐवजी राजकीय संघर्षाला प्राधान्य दिले जात असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. आगामी सभांमध्ये हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related to this topic: