Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > मुंबई

मुंबई : ७ मे रोजी ६ तास विमानतळ सेवा बंद; दोन्ही रनवे दुरुस्तीसाठी बंद

मुंबई विमानतळावर ७ मे रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत सहा तासांसाठी उड्डाण सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.


मुंबई  ७ मे रोजी ६ तास विमानतळ सेवा बंद दोन्ही रनवे दुरुस्तीसाठी बंद

Airport Maintenance Work |

मुंबई (Airport Maintenance Work) : मुंबई विमानतळावर ७ मे रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत सहा तासांसाठी उड्डाण सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. प्री-मान्सून देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी दोन्ही रनवे बंद ठेवले जाणार असल्याने या कालावधीत विमानतळ पूर्णतः नॉन-ऑपरेशनल राहणार आहे.

या बंददरम्यान रनवे ०९/२७ आणि रनवे १४/३२ हे दोन्ही मार्ग बंद राहतील. दरवर्षीच्या मान्सूनपूर्व तयारीचा हा एक भाग असून, पावसाळ्यात सुरक्षित आणि सुरळीत सेवा देण्यासाठी ही कामे आवश्यक असल्याचे विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) ने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे १,०३३ एकर परिसरात पसरलेल्या एअरसायड क्षेत्राच्या देखभालीसाठी ही कामे महत्त्वाची आहेत. जगातील अत्यंत व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई विमानतळावर संपूर्ण सेवा बंद ठेवण्याचा परिणाम लक्षात घेता, याबाबत सहा महिन्यांपूर्वीच विमान कंपन्या आणि संबंधित घटकांशी चर्चा करून वेळापत्रक ठरवण्यात आले आहे.

“मान्सून तयारी योजनेचा भाग म्हणून सर्व संबंधितांशी सहा महिने आधी समन्वय साधून विमान कंपन्यांना वेळापत्रकात आवश्यक बदल करण्याची संधी देण्यात आली,” असे MIAL कडून सांगण्यात आले.

यापूर्वीही विविध कारणांमुळे मुंबई विमानतळावरील उड्डाणांवर परिणाम झाला होता. ८ मार्च रोजी ६६ उड्डाणे (३२ आगमन, ३४ प्रस्थान) रद्द करण्यात आली होती. तर ३ मार्च रोजी पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एकूण १०७ उड्डाणे (५४ आगमन, ५३ प्रस्थान) रद्द झाली होती, ज्यामुळे अनेक प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला होता.