Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

अहेरीत विकृताला अटक

अहेरी पोलीसांनी विकृत मनोरुग्णाला केली अटक

अहेरी पोलिसांनी रात्रीच्या वेळी घरात घुसून तोडफोड व अश्लील कृत्ये करणाऱ्या विकृत मनोरुग्णाला ताब्यात घेतले, नागरिकांना मिळाला दिलासा.


अहेरी पोलीसांनी विकृत मनोरुग्णाला केली अटक

रात्री घरात घुसून तोडफोड, अश्लील कृत्यांमुळे नागरिक त्रस्त

पोलिसांच्या तत्पर कारवाईने महिलांना दिलासा; पुढील उपचारासाठी हालचाल


अहेरी : नगर पंचायत परिसरात गेल्या काही दिवसांपासून उच्छाद मांडणाऱ्या आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या एका विकृत मनोरुग्णाला अहेरी पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले आहे. स्थानिक नागरिक व महिलांच्या तक्रारीची तातडीने दखल घेत ही कारवाई करण्यात आली असून, त्यामुळे शहरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

गेल्या काही दिवसांपासून संबंधित व्यक्ती रात्रीच्या वेळी लोकांच्या घरात शिरून तोडफोड करणे, फळझाडांचे नुकसान करणे तसेच महिलांसमोर अश्लील चाळे करणे अशा प्रकारांमध्ये गुंतला होता. त्यामुळे परिसरात विशेषतः महिलांमध्ये मोठी भीती पसरली होती. नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे तक्रार देत तात्काळ कारवाईची मागणी केली होती.

तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक हर्षल ऐकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शोधमोहीम राबवून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. सध्या त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू असून पुढील उपचारासाठी त्याला वैद्यकीय केंद्रात किंवा मनोरुग्णालयात पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

“नागरिकांच्या सुरक्षेला आमचे प्राधान्य आहे. संबंधित व्यक्ती मनोरुग्ण असल्याने त्याला उपचारांची गरज आहे. मात्र त्याच्याकडून कोणालाही इजा होऊ नये यासाठी आम्ही त्याला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.”
— हर्षल ऐकरे, पोलिस निरीक्षक, अहेरी दरम्यान, स्थानिक महिलांनीही या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

“रात्रीच्या वेळी तो घरांवर चढून आंबे तोडणे, विटा फेकणे तसेच घाण करणे असे प्रकार करत होता. महिलांना पाहून विकृत कृत्ये करत असल्याने भीतीचे वातावरण होते. मात्र पोलिसांनी तत्काळ कारवाई केल्यामुळे आता आम्हाला सुरक्षित वाटत आहे.”
— सौ. पल्लवी सिलमवार, महिला नागरिक पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे अहेरीतील नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिस विभागाचे आभार मानले आहेत.

Related to this topic: