Breaking News
  • Washim : ऑनलाईन औषध विक्रीविरोधात आज एक दिवसीय देशव्यापी बंद
  • Nagpur : ऑल इंडिया मेडिकल संघटनेच्या बंदचा नागपूर येथील रुग्णांवर परिणाम
  • Nagpur : १ जुलैपासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई
  • जालन्यात गॅस टंचाईचा फटका,पुरीभाजीच्या दरात 10 रुपयांनी वाढ
  • हिंगोलीच्या भाजी मंडई परिसरात आठ दिवसांपूर्वी शेवगा तीस रुपये होता आता या शेवग्याचा प्रति किलो दर 50 रुपये झाला आहे.
  • पुण्यातील बालाजी नगरमध्ये गोळीबार
  • श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात गेल्या पंधरा दिवसात चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे
  • नाशिक जिल्ह्यातील ९ हजारांहून अधिक केमिस्ट संपात सहभागी
  • नाशिकमध्ये मेडिकल असोसिएशनच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

सिल्व्हर जुबली सोहळा

वर्ष २००० बॅचचा सिल्व्हर जुबली स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न

Silver Jubilee Celebrations: २५ वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत भावनिक सत्काराचा अनुभव घेतला.


वर्ष २००० बॅचचा सिल्व्हर जुबली स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न

Silver Jubilee Celebrations |

 

२५ वर्षांनी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा; शिक्षकांचा भावनिक सत्कार

कन्हान (Silver Jubilee Celebrations) : स्थानिक बाळीराम दाखणे हायस्कूल (विकास) येथील २००० बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा सिल्व्हर जुबली स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला. तब्बल २५ वर्षां नंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाले य जीवनातील आठवणींना उजाळा देत अविस्मरणीय क्षण अनुभवले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी विद्यार्थ्यांचे फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून कार्य क्रमाची सुरुवात झाली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाला औप चारिक प्रारंभ करण्यात आला. यानंतर उपस्थित शिक्षकांना व्यासपीठावर आमंत्रित करून (Silver Jubilee Celebrations) विद्यार्थ्यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन भाव पूर्ण सत्कार करण्यात आला. यामध्ये माजी मुख्याध्या पक श्री मंडपे सर, खर्चे सर माजी उपमुख्याध्यापक एकनाथ खर्चे सर, एन एस मालविय सर, नारनवरे सर, चंद्रकुमार चौकसे सर, ज्ञानप्रकाश यादव सर, किशोर संघई सर, श्रीमती ठमके मॅडम, चौकसे मॅडम, गजभि ये मॅडम, फरसोले मॅडम, सायरे काकु यांचा समावेश होता.

तसेच विद्यमान मुख्याध्यापक सचिन अल्लेड वार सर, पर्यवेक्षक पशिने सर, शारिरिक शिक्षक  माधव काठेके, शिक्षक अमित थटरे, विलास उईके,  कामडी सर आणि भुरे भाऊ, शाम मेंढे, भोंगाडे, श्रीम ती घोडमारे काकु, श्रीमती भरडे मॅडम यांचा विद्यार्थ्यां च्या वतीने सन्मान करण्यात आला. (Silver Jubilee Celebrations) कार्यक्रमास माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय देत सध्याच्या नोकरी, व्यवसाय व आयुष्यातील प्रवास सांगितला. “शाळेने दिलेल्या शिक्षणामुळेच आम्ही विविध क्षेत्रात यशस्वी झालो,” अशा भावना व्यक्त करत शिक्षकांप्रती कृतज्ञ ता व्यक्त केली.

शिक्षकांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत मार्गदर्शन केले. मनोरंजनात्मक खेळ, सुगम संगीत, वृक्षारोपण यांसारख्या उपक्रमांनी कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. माजी विद्यार्थ्यांनी शाळेला आवश्यक साहित्य भेट म्हणुन दिले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्या र्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. (Silver Jubilee Celebrations) स्नेह भोजनाचा आस्वाद घेताना अनेक विद्यार्थी भावुक झाले. २५ वर्षांनंतर भेट झाल्याने निरोप घेताना अने कांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन सचिन लुहुरे यांनी तर आभार किशोर धोटे यांनी मानले. सुमारे ८० माजी विद्यार्थी कुटुंबासह उपस्थित होते. “हा सोहळा आमच्यासाठी अविस्मरणीय ठरला असुन पुढील वर्षी याहुन भव्य कार्यक्रम घेऊ,” असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

Related to this topic: