१९ मार्चपासून रामलीला मैदानावर भागवत कथा उत्सव सुरू होईल, ज्यासाठी आंतरराष्ट्रीय कथाकार रमेशभाई ओझा सांगणार आहेत.
रामलीला मैदानावर सभामंडप उभारणीचे काम सुरू
हिंगोली (Srimad Bhagwat Katha) : येथील रामलीला मैदानावर १९ मार्च पासून सुरू होणाऱ्या श्रीमद् भागवत कथेची जय्यत तयारी सुरू झाली असुन रामलीला मैदानावर होणाऱ्या या (Srimad Bhagwat Katha) कार्यक्रमासाठी मंडप उभारणीचे काम सुरू झाले आहे. आंतरराष्ट्रीय कथाकार रमेशभाई ओझा रामकथा सांगणार आहेत.
कथेनिमित्त ८ मार्च रविवार रोजी बासापुजनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. त्यानिमित्ताने शहरातील मुख्य मार्गावरून रामलीला मैदानापर्यत मिरवणूक हिंगोली नगर परिषदेचे नगरसेवक तथा गटनेते श्रीराम बांगर यांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर रामलीला मैदानावर बासापुजनाचा (Srimad Bhagwat Katha) कार्यक्रम झाला. यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती
बद्रीनारायण मंदिरापासुन प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेली मिरवणूक रामलिला मैदानावर पोहचल्यावर येथे वैद्यीक मंत्रोच्चारात स्तंभाची पुजा करण्यात आली. दरम्यान शहरातील रामलीला मैदानावर १९ ते २५ मार्च या कालावधीत दुपारी चार ते ७.३० वाजेपर्यंत रमेशभाई ओझा हे श्रीमद् भागवत कथा सांगणार आहेत. त्यानिमित्ताने १९ मार्च गुरुवार रोजी सकाळी ११ वाजता शहरातून (Srimad Bhagwat Katha) शोभायात्रा काढण्यात येणार आहे. हि शोभायात्रा सेक्रेट हार्ट इंग्लिश स्कूल जवळ असलेल्या गणपती मंदिरापासून निघणार आहे ती पोस्टऑफीस, भारतीय विद्या मंदिर शाळा, जवाहर रोड, महात्मा गांधी चौक, इंदिरा गांधी चौक, नंतर रामलीला मैदानावर असलेल्या भागवत कथा मंडप येथे विसर्जित होणार आहे.
भागवत कथेनिमित्त (Srimad Bhagwat Katha) १९ ते २५ मार्च दुपारी चार ते ७.३० या कालावधीत गुरुवारी कथा प्रारंभ होणार आहे. २० मार्च शुक्रवार रोजी नित्यकथा, २१ मार्च शनिवार रोजी नित्यकथा, २२ मार्च रविवार रोजी भगवान कृष्ण जन्म, २३ मार्च सोमवार रोजी गोवर्धन पूजा, २४ मार्च मंगळवार रोजी रुख्मिणी विवाह २५ मार्च बुधवार रोजी सकाळी ९ ते १ यावेळी कथेची सांगता व आरतीचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.
या (Srimad Bhagwat Katha) कार्यक्रमाचे आयोजन गजराज बाल गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. सध्या रामलीला मैदानावर सुरू होणाऱ्या भागवत कथेची जय्यत तयारी सुरू झाली असुन मंडप उभारणीचे काम सुरू झाले आहे. गजराज बाल गणेश मंडळाचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे.