व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फीचर

व्हॉट्सअ‍ॅप आणत आहे युझरनेमचे नवीन फीचर, प्रायव्हसीची ग्यारंटी

WhatsApp युझरनेम फीचरद्वारे वापरकर्त्यांचा मोबाईल नंबर खाजगी ठेवण्याची सुविधा आणत आहे. यामुळे चॅटिंग, प्रायव्हसी सेटिंग्स आणि नियंत्रणात मोठा सुधारणा होणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप आणत आहे युझरनेमचे नवीन फीचर, प्रायव्हसीची ग्यारंटी

मेसेजिंग क्षेत्रातील आघाडीचे ॲप WhatsApp आपल्या वापरकर्त्यांसाठी एक मोठे अपडेट आणण्याच्या तयारीत आहे. ‘युझरनेम’ फीचरमुळे आता चॅटिंगची पद्धत पूर्णपणे बदलणार असून, मोबाईल नंबर शेअर करण्याची गरज जवळपास संपणार आहे.

या नव्या फीचरअंतर्गत प्रत्येक वापरकर्त्याला एक युनिक युझरनेम निवडता येणार आहे. या युझरनेमच्या आधारे इतर वापरकर्ते त्यांना शोधू शकतील आणि थेट संवाद सुरू करू शकतील. हे फीचर Instagram आणि Telegram प्रमाणे कार्य करणार आहे.

यामुळे सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रायव्हसीमध्ये वाढ होणार आहे. आतापर्यंत व्हॉट्सॲपवर संपर्क साधण्यासाठी मोबाईल नंबर आवश्यक होता. मात्र, आता युझरनेमद्वारे संवाद साधता येणार असल्याने वापरकर्त्यांचा नंबर पूर्णपणे खाजगी ठेवता येईल. तसेच, प्रोफाइल फोटो आणि इतर वैयक्तिक माहितीवरही अधिक नियंत्रण मिळण्याची शक्यता आहे.

हे सुध्दा वाचा : एआयमुळे रोजगारावर संकट की संधी, तज्ज्ञांचे मतभेद

या फीचरमुळे वापरकर्त्यांना अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत. स्वतःचा युनिक युझरनेम सेट करणे, कोणाला मेसेज करण्याची परवानगी द्यायची हे ठरवणे, तसेच अतिरिक्त प्रायव्हसी सेटिंग्स वापरणे शक्य होणार आहे.

मात्र, या फीचरमुळे स्पॅम मेसेजेस वाढण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. युझरनेमच्या मदतीने कोणीही सहजपणे इतरांना शोधू शकत असल्याने अनोळखी लोकांकडून मेसेज येऊ शकतात. यावर उपाय म्हणून Meta Platforms अतिरिक्त सुरक्षा व नियंत्रण पर्याय देण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

व्यवसाय आणि कंटेंट क्रिएटर्ससाठी हे फीचर विशेष फायदेशीर ठरणार आहे. नंबर शेअर न करता ग्राहकांशी संवाद साधता येणार असल्याने प्रोफेशनल कम्युनिकेशन अधिक सोपे होईल.

सध्या हे फीचर मर्यादित वापरकर्त्यांसाठीच उपलब्ध असून अँड्रॉइड आणि iOS प्लॅटफॉर्मवर त्याची चाचणी सुरू आहे. येत्या काळात हे फीचर सर्वांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता असून, व्हॉट्सॲपच्या इतिहासातील हे एक महत्त्वाचे अपडेट ठरणार आहे.   

संबंधित सामग्री

केतन अग्रवाल प्रकरणात मोठा डिजिटल पुरावा; 1,801 चॅट्सचा डेटा रिकव्हर, लोहगडवरील फोटोंमधून कटाचा तपास पुढे

केतन अग्रवाल प्रकरणात मोठा डिजिटल पुरावा; 1,801 चॅट्सचा डेटा रिकव्हर, लोहगडवरील फोटोंमधून कटाचा तपास पुढे

केतन अग्रवाल प्रकरणात 1,801 चॅट्सचा डेटा, 11 डिलीट WhatsApp चॅट्स आणि लोहगडवरील फोटोंचा तपास; 5,053 पानी आरोपपत्रात डिजिटल पुरावे.

Oct 03, 2026

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून सीए तणावात; आत्महत्येपूर्वी WhatsApp मेसेज

मुंबईत ३९ वर्षीय सीएने ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वीच्या WhatsApp मेसेजच्या आधारे पत्नी आणि तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल.

Sep 24, 2026
WhatsAppचा मोठा निर्णय! ८ सप्टेंबरपासून जुन्या Android फोनवर बंद होणार सेवा; iPhone युजर्ससाठीही डेडलाइन जाहीर

WhatsAppचा मोठा निर्णय! ८ सप्टेंबरपासून जुन्या Android फोनवर बंद होणार सेवा; iPhone युजर्ससाठीही डेडलाइन जाहीर

WhatsAppने जुन्या ऑपरेटिंग सिस्टमसाठी सपोर्ट बंद करण्याचा निर्णय घेतला असून Android आणि iPhone युजर्ससाठी नवीन किमान सिस्टम आवश्यकता जाहीर केली आहे.

Sep 07, 2026
दररोज अडीच तास सोशल मीडिया वापरता? डिप्रेशनच्या लक्षणांशी वाढतोय संबंध; 11 वर्षांच्या अभ्यासातून धक्कादायक निष्कर्ष

दररोज अडीच तास सोशल मीडिया वापरता? डिप्रेशनच्या लक्षणांशी वाढतोय संबंध; 11 वर्षांच्या अभ्यासातून धक्कादायक निष्कर्ष

स्मार्टफोन आणि इंटरनेटमुळे सोशल मीडिया हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे.

Sep 02, 2026
इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशन महाराष्ट्रच्या वार्ताफलकाचे उमरेड विभागात उत्साहात उद्घाटन

इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशन महाराष्ट्रच्या वार्ताफलकाचे उमरेड विभागात उत्साहात उद्घाटन

इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशन महाराष्ट्रच्या वतीने उमरेड विभाग, नागपूर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या वार्ताफलकाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.

Aug 26, 2026