Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

Electricity Line Staff Association Maharashtra

इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशन महाराष्ट्रच्या वार्ताफलकाचे उमरेड विभागात उत्साहात उद्घाटन

इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशन महाराष्ट्रच्या वतीने उमरेड विभाग, नागपूर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या वार्ताफलकाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.


इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशन महाराष्ट्रच्या वार्ताफलकाचे उमरेड विभागात उत्साहात उद्घाटन

उमरेड : इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशन महाराष्ट्रच्या वतीने उमरेड विभाग, नागपूर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या वार्ताफलकाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. संघटनेचे कार्य, कामगारांच्या प्रश्नांशी संबंधित घडामोडी, शासनाचे निर्णय, संघटनेचे विविध उपक्रम तसेच महत्त्वाच्या सूचना प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचविण्यासाठी हा वार्ताफलक महत्त्वाचे माध्यम ठरणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष रमेशदादा वाटकर साहेब होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री राजु अली मुल्ला साहेब यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी उमरेड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री जळगावकर साहेब तसेच सिर्सी वितरण केंद्राचे सहाय्यक अभियंता श्री रामटेके साहेब प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमात संघटनेचे उपाध्यक्ष विजय सोनटक्के, उपसरचिटणीस लक्ष्मण वैरागडे, प्रवक्ता राजेश बावनकुळे आणि नागपूर प्रादेशिक सचिव नागेश ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले.

याशिवाय नागपूर परिमंडळ सचिव श्री जगदीश दोहतरे, नागपूर ग्रामीण प्रविभाग अध्यक्ष श्री प्रदीप गभणे, नागपूर ग्रामीण प्रविभाग सचिव श्री रंगलाल रामटेके तसेच नागपूर शहर प्रविभाग सचिव श्री हेमंत पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कामगार आणि संघटनेतील संवादाचा दुवा

यावेळी मार्गदर्शन करताना अध्यक्ष रमेशदादा वाटकर साहेब यांनी वार्ताफलकाचे महत्त्व स्पष्ट केले. वार्ताफलक हा केवळ सूचना लावण्यापुरता मर्यादित नसून संघटना आणि कामगार यांच्यातील संवादाचा महत्त्वपूर्ण दुवा असल्याचे त्यांनी सांगितले.

संघटनेचे निर्णय, कामगारांच्या प्रश्नांवरील भूमिका, शासनाचे आदेश, विविध परिपत्रके तसेच संघटनेच्या उपक्रमांची माहिती पारदर्शकपणे प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रमुख मार्गदर्शक राजु अली मुल्ला यांनी संघटनेची एकजूट, शिस्त आणि कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करण्याच्या गरजेवर भर दिला. संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी आणि कामगाराने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.

अचूक माहिती वेळेत पोहोचविण्यावर भर

प्रवक्ता राजेश बावनकुळे यांनी संघटनेच्या प्रभावी संवादव्यवस्थेत वार्ताफलकाची भूमिका अधोरेखित केली. कामगारांपर्यंत अचूक आणि अधिकृत माहिती वेळेत पोहोचविणे ही संघटनेची जबाबदारी असून, वार्ताफलकाच्या माध्यमातून ही संवादप्रक्रिया अधिक सक्षम होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

वार्ताफलकाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री आचल वंजारी, श्री रोशन गेडाम, श्री कमलेश नांदकर, श्री आशिष बनकर यांच्यासह संपूर्ण उमरेड विभागातील संघटनेचे सन्माननीय पदाधिकारी आणि सभासद यांनी अथक परिश्रम घेतले.

या कार्यक्रमामुळे उमरेड विभागातील कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कामगारांची एकजूट, संघटनेची ताकद आणि पारदर्शक संवाद या त्रिसूत्रीच्या माध्यमातून इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशन महाराष्ट्र अधिक सक्षम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

Related to this topic: