अखंड शिवनाम सप्ताह

अन्नप्रसादातून शरीरशुद्धी तर ज्ञानप्रसादातून आत्मशुद्धी!

Akhand Shivanam Saptah: आलमला येथे झालेल्या ५५ व्या अखंड शिवनाम सप्ताहात शिभप राजेश्वर स्वामी यांनी ज्ञानप्रसाद आणि अन्नप्रसादाच्या महत्वावर प्रकाश टाकला.

अन्नप्रसादातून शरीरशुद्धी तर ज्ञानप्रसादातून आत्मशुद्धी!

Akhand Shivanam Saptah

शिभप राजेश्वर स्वामी : आलमला येथील ५५ व्या अखंड शिवनाम सप्ताहाची सांगता

लातूर (Akhand Shivanam Saptah) : प्रसाद हा दोन प्रकारचा असतो. अन्नाचा प्रसाद आणि ज्ञानाचा प्रसाद. अन्नाचा प्रसाद शरीरशुद्धी करतो तर ज्ञानप्रसाद आत्मशुद्धी करतो, असे प्रतिपादन शिभप राजेश्वर स्वामी जांब गव्हाणकर (हिंगोली) यांनी केले. 

औसा तालुक्यातील आलमला येथे ५५ व्या अखंड शिवनाम सप्ताह (Akhand Shivanam Saptah) व ग्रंथराज परमरहस्य पारायण व शिवमहापुराण कथा सोहळ्याच्या समाप्तीनिमित्त झालेल्या काल्याच्या कीर्तनात ते बोलत होते. यावेळी औसा येथील श्री ष.ब्र.लिं.१०८ सद्‌गुरु निरंजन शिवाचार्य महाराज व जिंतूर येथील महा शिवपुराण कथाकार श्री.प.ब्र. १०८ सद्‌गुरु अमृतेश्वर शिवाचार्य महाराज उपस्थित होते. यावेळी सद्‌गुरु निरंजन शिवाचार्य महाराज व सद्‌गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांचे आशीर्वचन झाले.

शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या 'गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी,' या अभंगावर बोलताना शिभप राजेश्वर स्वामी म्हणाले की, माणसाच्या जीवनातील काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर या षडरिपुंचा नाश याप्रसादामुळे होतो. माणसाला ब्रह्मानंदाचे सुख मिळते आणि जन्म मृत्यूचा फेरा यामुळे चुकतो, असे शिभप राजशेखर स्वामी महाराज म्हणाले.
आलमला येथे सोमवार दि. ३० मार्चपासून सुरू असलेल्या अखंड शिवनाम सप्ताह (Akhand Shivanam Saptah) , ग्रंथराज परमरास्य पारायण व शिव महापुराण कथा या सोहळ्याची सांगता सोमवारी (दि.०६) रोजी झाली. या सोहळ्याचे यंदाचे ५५ वे वर्ष आहे. 

या सोहळ्यात श्री.प.ब्र. १०८ सद्‌गुरु अमृतेश्वर शिवाचार्य महाराज, जिंतूरकर यांची शिवमहापुराण कथा आकर्षण ठरली. या कथेसाठी दररोज भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
सप्ताहाचे व्यासपीठ प्रमुख म्हणून शि.भ.प. श्री. रमेश महाराज वांजरखेडकर, सह व्यासपीठ प्रमुख म्हणून शि.भ.प.श्री. शिवरूद्र विश्वनाथप्पा धाराशिवे यांनी काम पाहिले. सप्ताहात दररोज पंचक्रोशीतील भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला. सप्ताहात दररोज पहाटे ४ ते ६ शिवपाठ, ६ ते ७ रुद्राभिषेक, ७ ते १० परमरहस्य पारायण, १० ते १२ प्रसाद, १२ ते २ गाथा भजन, २ ते ५ महिला भजन, सायं ५ ते ६ प्रार्थना, ६ ते ८ महाप्रसाद, ८ ते ११ शिवमहापुराण कथा, रात्री ११ नंतर शिवजागर असे धार्मिक कार्यक्रम पार पडले. 

काल्याच्या कीर्तनाने महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता झाली. सप्ताहात विविध सेवा केलेल्या सेवेकऱ्यांचा गौरव यावेळी सद्‌गुरु निरंजन शिवाचार्य महाराज व सद्‌गुरु अमृतेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Akhand Shivanam Saptah) सप्ताहासाठी सर्व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

संबंधित सामग्री

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
लैंगिक अत्याचारप्रकरणी २० वर्षे सश्रम कारावास!

लैंगिक अत्याचारप्रकरणी २० वर्षे सश्रम कारावास!

Latur Sexual Assault Case: नागझरी येथे आरोपीने १२ वर्षीय मुलीच्या भोळसर स्वभावाचा गैरफायदा घेत तिला लातूर शहर फिरवून आणण्याचे सांगितले. त्यानंतर तिला दुचाकीवरून पुणे

Oct 02, 2026
नांदेड उप महानिरीक्षकांच्या पथकाने घातले, लातूर पोलिसांच्या डोळ्यात झणझणीत अंजन 

नांदेड उप महानिरीक्षकांच्या पथकाने घातले, लातूर पोलिसांच्या डोळ्यात झणझणीत अंजन 

Latur Matka-Gambling Raid: लातूरचे पोलीस हेल्मेट सक्तीच्या कामगिरीत गुंतले असताना दुसरीकडे नांदेडच्या पोलीस उप महानिरीक्षकांच्या पथकाने लातूर शहर जिल्ह्यात राजरोस चालणाऱ्या मटका व जुगारांवर धाड..

Oct 01, 2026
हेल्मेट सक्तीमुळे अपघाती मृत्युसंख्येत घट

हेल्मेट सक्तीमुळे अपघाती मृत्युसंख्येत घट

Latur Helmet Rule Mandatory: गेल्या महिनाभरात झालेल्या अपघाती मृत्यूच्या आकडेवारीतून लातूर पोलिसांच्या हेल्मेट सक्तीचा सकारात्मक परिणाम झाल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला. ऑगस्ट मधील ३३ अपघाती मृत्यू

Oct 01, 2026
दुहेरी खून प्रकरणात पाच जणांना जन्मठेप! 

दुहेरी खून प्रकरणात पाच जणांना जन्मठेप! 

Latur Double Murder Case: डांगेवाडी येथे पाणंद रस्त्याच्या वादातून झालेल्या दुहेरी खून प्रकरणात पाच आरोपींना निलंगा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने 29 सप्टेंबर 2026 रोजी जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावल

Sep 30, 2026