Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > विदेश

Daveigh Chase

‘द रिंग’ फेम अभिनेत्री डेव्ही चेसचे वयाच्या 35 व्या वर्षी निधन; चाहत्यांना मोठा धक्का

हॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट डेव्ही चेस हिच्या अकाली निधनामुळे मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे.


‘द रिंग’ फेम अभिनेत्री डेव्ही चेसचे वयाच्या 35 व्या वर्षी निधन चाहत्यांना मोठा धक्का

Daveigh Chase |

गंभीर रक्तसंसर्ग आणि मेनिन्जाइटिसशी सुरू होती झुंज; बॉयफ्रेंडने दिली निधनाची पुष्टी

(Daveigh Chase) मनोरंजन विश्वाला सलग दुसरा धक्का बसला आहे. 'कुमकुम भाग्य' फेम अभिनेत्री संचिता उगले हिच्या निधनाची चर्चा सुरू असतानाच, हॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट डेव्ही चेस हिच्या निधनाची बातमी समोर आली आहे. वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी डेव्हीने अखेरचा श्वास घेतल्याने तिचे चाहते आणि चित्रपटसृष्टीतील सहकारी हळहळ व्यक्त करत आहेत.

‘द रिंग’ या गाजलेल्या हॉरर चित्रपटातील ‘समारा मॉर्गन’ या भूमिकेमुळे जागतिक स्तरावर ओळख मिळवलेल्या डेव्ही चेसने आपल्या अभिनय आणि आवाजाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप पाडली होती. तिच्या अकाली निधनामुळे मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डेव्ही चेस काही काळापासून गंभीर आरोग्य समस्यांशी सामना करत होती. तिला मेनिन्जाइटिस आणि रक्तातील संसर्गाचा त्रास होता. कालांतराने हा संसर्ग अधिक गंभीर होत गेला आणि त्याचा परिणाम तिच्या संपूर्ण शरीरावर झाला. संसर्ग वाढत गेल्याने तिच्या विविध अवयवांनी हळूहळू काम करणे बंद केले, अशी माहिती समोर आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंगळवारी डेव्हीचे निधन झाले. तिच्या मृत्यूची माहिती तिच्या बॉयफ्रेंडनेही अधिकृतपणे दिली आहे. अखेरच्या काही दिवसांत तिला मोठ्या शारीरिक वेदनांचा सामना करावा लागल्याचे सांगितले जात आहे.

डेव्ही चेस ही अमेरिकन अभिनेत्री आणि व्हॉइस आर्टिस्ट होती. तिचा जन्म 24 जुलै 1990 रोजी लास वेगास येथे झाला होता. बालकलाकार म्हणून मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केलेल्या डेव्हीने अभिनयासोबतच अनेक अॅनिमेशन प्रकल्पांमध्ये आवाज दिला होता.

डिस्नीच्या लोकप्रिय अॅनिमेटेड चित्रपट ‘Lilo & Stitch’ मधील मुख्य पात्र ‘लिलो’ला आवाज देऊन तिने विशेष लोकप्रियता मिळवली. त्यानंतर ‘द रिंग’ चित्रपटातील ‘समारा मॉर्गन’ या भयावह पात्राच्या भूमिकेमुळे ती जगभरातील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. अभिनय आणि व्हॉइस ओव्हर या दोन्ही क्षेत्रांत तिने उल्लेखनीय कामगिरी करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.

Related to this topic: