Breaking News
  • 40 वर्षापासून सुरू असलेल्या अवैध दारू धंद्यांवर पोलिसांनी का कारवाई केली नाही - अण्णा बनसोडे
  • मनोज जरांगे पाटील यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासणीसाठी नकार दिला
  • शिरूर तालुक्यातील इनामगाव येथे मायेपुढे बिबट्याही नमला; सासूसाठी सुनबाई आणि नातू बिबट्याला भिडले!
  • शिर्डीहून मुंबईकडे निघालेले प्रसाद लाड पुन्हा अंतरवली सराटीकडे रवाना
  • गोकुळ निवडणुकीत ‘हलाल सर्टिफिकेट’चा नवा वाद
  • कांदा, साखर प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा- सुनेत्रा पवार
  • व्यापाऱ्यांकडून नाही तर शेतकाऱ्यांकडून कांदा खरेदी व्हावा ही मागणी- देवेंद्र फडणवीस
  • गडचिरोली जिल्ह्यात हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा रेड व ऑरेंज अलर्ट देण्यात आला
  • वाशिमच्या तोंडगाव फाटा परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट

होम > संपादकीय > अग्रलेख

तामिळनाडूत क्रांती...!


तामिळनाडूत क्रांती

गेल्या सहा दशकांपासून तामिळनाडूत द्रमुक चळवळीशी संंबंधित पक्षाचीच सत्ता राहत आली आहे. कधी द्रमुक तर कधी अण्णाद्रमुक पक्ष आलटून पालटून सत्तेत राहिले. या सहा दशकांच्या द्रमुक वाटचालीला खंडित करीत यावेळी अभिनेता थलपती विजय यांच्या 'टीव्हीके' पक्षाने तामिळनाडूत आपला झेंडा रोवला आहे. अवघ्या दीड वर्षांपूर्वी राजकारणात प्रवेश केलेल्या विजयने आपल्या झंझावाती प्रचारातून तामिळनाडूत एकप्रकारची क्रांतीच घडवून आणली. विजय यांंच्या प्रचारसभांना मोठी गर्दी होत होती, त्यांच्या रॅलीतही खूप गर्दी दिसायची; परंतु त्यानंतरही त्यांचा पक्ष द्रमुक पक्षांची तामिळनाडूच्या राजकारणावरील पकड सैल करू शकेल असे वाटत नव्हते. एखाद-दोन संस्थांचा अपवाद वगळता इतर कोणत्याही सर्व्हेक्षण संस्थेने आपल्या मतदानोत्तर निकषात 'टीव्हीके'ला फारशा जागा दिल्या नव्हत्या; परंतु थलपती विजयने सगळे अंदाज धुळीस मिळवत मोठा विजय प्राप्त केला. 'इंडिया' आघाडीत काँग्रेसनंतर द्रमुक आणि तृणमूल हेच दोन मुख्य आधार पक्ष होते; परंतु या निवडणुकीत या दोन्ही पक्षांना मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे काँग्रेसला केरळमध्ये सत्ता स्थापन करण्याची संधी मिळूनही 'इंडिया' आघाडीची ताकद वाढली, असे म्हणता येणार नाही. केरळमध्ये लागोपाठ दोन वेळा एकच आघाडी निवडून येत नाही हा इतिहास होता. त्याला मागच्या वेळी डाव्या आघाडीने छेद दिला खरा; परंतु लागोपाठ तिसर्‍यांदा एकच आघाडी निवडून येण्याचा विक्रम अशक्यप्राय होता. त्यामुळे यावेळी केरळमध्ये काँग्रेसप्रणीत आघाडी विजयी होणार हे आधीपासूनच स्पष्ट होते. केरळमधील पराभवाने डाव्यांच्या हाती असलेले शेवटचे राज्यही गेले. त्यामुळे सध्या तरी भारताचे राजकारण 'डावेमुक्त' झाल्याचे दिसते. आसाम, पुद्दुचेरीत भाजप सत्ता राखणार हेही अपेक्षितच होते. चमत्कार झाला तो तामिळनाडूत आणि धक्का बसला तो प.बंगालमध्ये.

Related to this topic: