Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > मनोरंजन

आता होणार राडा..; 'झिम्मा ३'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर होताच कमेंट्स

'झिम्मा', 'झिम्मा २' नंतर आता 'झिम्मा' सिनेमाचा तिसरा भाग लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.


आता होणार राडा झिम्मा ३च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर होताच कमेंट्स

Jhimma 3 |

Jhimma 3 : 'झिम्मा', 'झिम्मा ' नंतर आता 'झिम्मा' सिनेमाचा तिसरा भाग लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. 'झिम्मा ' सिनेमाची घोषणा करत हेमंत ढोमे याने कॅप्शनमध्ये, 'आपला आनंदाचा खेळ 'यावेळी तिसराच आहे'!!! झिम्मा ', असं लिहिलं आहे. यावर कमेंट करत अभिनेत्री वैदेही परशुरामी म्हणाली, 'वाह.. वाह.. राडा..', तर अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी यांनीदेखील कमेंट केली आहे. सिनेमाच्या दोन्ही भागांत सायली हिने भन्नाट भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता तिसऱ्या भागात काय कमाल प्रेक्षकांना अनुभवता येणार.. याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 'झिम्मा ' सिनेमाची घोषणा करत हेमंत याने अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याचा एका फोटो पोस्ट केला आहे.

अभिनेत्याच्या फोटो भोवती अनेक बॅग्स पडलेल्या दिसत  आहे.. सुटकेसेस, क्रिकेट बॅट आणि ते सूर्यफूल.. यामुळे यावेळीदेखील काहीतरी ट्विस्ट सिनेमात असेल असं दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'झिम्मा ' सिनेमाची चर्चा रंगली आहे. 'झिम्मा ' सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, हेमंत ढोमे दिग्दर्शित सिनेमाच्या निर्मितीची जबाबदारी अभिनेत्री क्षिती जोगची आहे.. सिनेमा जानेवारी २०२७ ला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.. त्यामुळे २०२७ या नव्या वर्षाची सुरुवात धमाकेदार सिनेमाने होणार असं म्हणायला हरकत नाही.

Related to this topic: