Galaxy Apartments

सलमान खानने वांद्र्यातील आलिशान फ्लॅट 3.50 कोटींना विकला; ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’ सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान त्याच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळेही सातत्याने चर्चेत असतो.

सलमान खानने वांद्र्यातील आलिशान फ्लॅट 3.50 कोटींना विकला; ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’ सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण

Galaxy Apartments

2015 मध्ये 2.88 कोटींना खरेदी केलेल्या 758 चौरस फुटांच्या फ्लॅटचा 9 जुलै रोजी व्यवहार पूर्ण

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान त्याच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळेही सातत्याने चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून तो वांद्रे येथील प्रसिद्ध ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’मधील निवासस्थान सोडून नव्या घरात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याचदरम्यान सलमानने वांद्र्यातील आपला एक आलिशान फ्लॅट विकल्याची माहिती समोर आली आहे.

वृत्तानुसार, सलमान खानने वांद्रे येथील ‘शिव-आस्था हाइट्स’ इमारतीतील 758 चौरस फुटांचा फ्लॅट सुमारे 3.50 कोटी रुपयांना विकला आहे. त्याने 2015 मध्ये ही मालमत्ता 2.88 कोटी रुपयांना खरेदी केली होती. या व्यवहारात फ्लॅटसोबत दोन कार पार्किंगच्या जागांचाही समावेश आहे.

9 जुलै रोजी व्यवहार पूर्ण

नोंदणी कागदपत्रांनुसार, या फ्लॅटचा व्यवहार 9 जुलै रोजी पूर्ण झाला. कार्पेट एरियाच्या आधारे मालमत्तेचे मूल्य प्रति चौरस फूट सुमारे 46,000 रुपये निश्चित करण्यात आले होते.

हा फ्लॅट मुनिरा अकबर अली दांडावाला, महदियाली अकबर अली दांडावाला आणि झेहरा यांनी खरेदी केला आहे. कागदपत्रांनुसार, खरेदीदारांनी या व्यवहारासाठी 21 लाख रुपये मुद्रांक शुल्क आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क भरले आहे. मात्र, या व्यवहाराबाबत सलमान खान किंवा नवीन मालकांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

सलमान खान ‘गॅलेक्सी’ सोडणार?

सलमान खान अनेक वर्षांपासून मुंबईतील वांद्रे येथील ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’मध्ये वास्तव्यास आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत समोर आलेल्या प्रसारमाध्यमांच्या वृत्तांनुसार, लॉरेन्स बिश्नोईकडून मिळणाऱ्या सततच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सलमान वांद्र्यातच नवीन घर बांधण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

‘गॅलेक्सी अपार्टमेंट’पासून काही अंतरावर सहा मजली सी-फेसिंग घर उभारण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. या प्रकल्पाला ‘महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी’ची मंजुरी मिळाल्याची माहितीही समोर आली आहे. संबंधित जमीन सलमान खानने त्याची आई सलमा खान यांच्या नावाने खरेदी केल्याचे सांगितले जात आहे.

आगामी चित्रपटांमध्येही सलमान व्यस्त

सलमान खानच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, तो लवकरच अपूर्व लाखिया यांच्या ‘मातृभूमी’ या चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय, दाक्षिणात्य सिनेनिर्माते वामशी पैदिपल्ली यांच्या दिग्दर्शनाखालील एका ॲक्शन-थ्रिलर चित्रपटातही तो काम करणार आहे. हा चित्रपट 2027 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

संबंधित सामग्री

“कमाल कर दिया पायलट जी!” फ्लायदुबईच्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे सलमान खानकडून कौतुक

“कमाल कर दिया पायलट जी!” फ्लायदुबईच्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे सलमान खानकडून कौतुक

फ्लायदुबई FZ1073 संकटातील कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाचे सलमान खानने कौतुक केले. मोदींसोबतच्या संवादात मच्छार यांनी थरारक अनुभव सांगितला.

Oct 03, 2026
‘रात्री फक्त झोपण्यासाठी घरी जातो’; ‘आयुष्य फक्त प्रवास आणि ऑफिसमध्ये संपतंय’; मुंबईकराची पोस्ट वाचून नेटकरीही भावुक

‘रात्री फक्त झोपण्यासाठी घरी जातो’; ‘आयुष्य फक्त प्रवास आणि ऑफिसमध्ये संपतंय’; मुंबईकराची पोस्ट वाचून नेटकरीही भावुक

मुंबईत घर घेण्याच्या वाढत्या खर्चामुळे शहराबाहेर राहण्याचा पर्याय स्वीकारणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी रोजचा लोकल प्रवास हा आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे.

Aug 25, 2026
ताडदेवच्या घराच्या व्यवहारावरून वाद; भावेश कावरेने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला...

ताडदेवच्या घराच्या व्यवहारावरून वाद; भावेश कावरेने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला...

मुंबईतील ताडदेव परिसरातील एका फ्लॅटच्या विक्री व्यवहारावरून सोशल मीडियावर सुरू झालेल्या चर्चेला आता नवे वळण मिळाले आहे.

Aug 13, 2026
समृद्धी महामार्गावर धक्कादायक घटना; पत्नीची कारमध्ये हत्या करून तीन मुलांसह पतीने गाठले पोलीस ठाणे

समृद्धी महामार्गावर धक्कादायक घटना; पत्नीची कारमध्ये हत्या करून तीन मुलांसह पतीने गाठले पोलीस ठाणे

वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Jul 14, 2026
गुरु रंधावाच्या जिमवर गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली जबाबदारीचा दावा

गुरु रंधावाच्या जिमवर गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली जबाबदारीचा दावा

प्रसिद्ध गायक गुरु रंधावा यांच्या फिटनेस सेंटर फ्रँचायझीचा भाग असलेल्या जिमवर बुधवारी रात्री गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.

Jun 11, 2026