Character Suspicion

समृद्धी महामार्गावर धक्कादायक घटना; पत्नीची कारमध्ये हत्या करून तीन मुलांसह पतीने गाठले पोलीस ठाणे

वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

समृद्धी महामार्गावर धक्कादायक घटना; पत्नीची कारमध्ये हत्या करून तीन मुलांसह पतीने गाठले पोलीस ठाणे

चारित्र्यावर संशयातून घडली हत्या; कारंजा पोलीस ठाण्यात स्वतःहून जाऊन आरोपीची कबुली, तीन निरागस मुलांचे दृश्य हेलावून टाकणारे

वाशीम: वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. चारित्र्यावर संशय घेत एका व्यक्तीने भरधाव कारमध्येच पत्नीची हत्या केल्याचा आरोप असून, त्यानंतर तीन लहान मुलांना सोबत घेऊन तो थेट कारंजा पोलीस ठाण्यात पोहोचला. तेथे त्याने पोलिसांसमोर स्वतःच्या गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेदरम्यान आईच्या मृत्यूची कल्पनाही नसलेली तीनही चिमुकली मुले पोलीस ठाण्यात शांतपणे झोपल्याचे दृश्य उपस्थितांचे मन हेलावून टाकणारे ठरले.

या प्रकरणातील आरोपीचे नाव सलमान खान असून, तो उत्तर प्रदेशमधून आपल्या कारने महाराष्ट्रात आला होता. त्याच्यासोबत पत्नी हसीना बांनो आणि त्यांची तीन लहान मुले प्रवास करत होती. प्रवासादरम्यान पती-पत्नीमध्ये चारित्र्यावर संशय घेण्याच्या कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, संतापाच्या भरात सलमान खान याने पत्नीची गळा हत्या केली. ही संपूर्ण घटना त्यांची तीनही लहान मुले कारमध्ये उपस्थित असतानाच घडली.

घटनेनंतर आरोपीने काही किलोमीटरचा प्रवास करून कारंजा पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्यासोबत आलेल्या तीन चिमुकल्या मुलांना पाहून पोलिसांसमोरही मोठा प्रश्न निर्माण झाला. आईचा मृत्यू झाला असून वडिलांना अटक होणार असल्याने ही तिन्ही मुले पालकांच्या आधारापासून वंचित झाली आहेत.

पोलीस ठाण्यात आल्यानंतर सलमान खान याने मुलांना तेथे अंथरलेल्या एका ब्लँकेटवर झोपवले. आईसोबत नेमके काय घडले आहे आणि आता आपल्यावरील पालकांचे छत्र हरपले आहे, याची या निरागस मुलांना कोणतीही जाणीव नव्हती. वडिलांसोबत शांतपणे पोलीस ठाण्यात आलेली ही तिन्ही मुले काही वेळातच ब्लँकेटवर झोपून गेली. हे दृश्य पाहून तेथे उपस्थित पोलिसांसह अन्य व्यक्तीही भावूक झाल्या.

 

संबंधित सामग्री

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
“कमाल कर दिया पायलट जी!” फ्लायदुबईच्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे सलमान खानकडून कौतुक

“कमाल कर दिया पायलट जी!” फ्लायदुबईच्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे सलमान खानकडून कौतुक

फ्लायदुबई FZ1073 संकटातील कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाचे सलमान खानने कौतुक केले. मोदींसोबतच्या संवादात मच्छार यांनी थरारक अनुभव सांगितला.

Oct 03, 2026
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ७ जणांचा मृत्यू, १८ गंभीर जखमी

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ७ जणांचा मृत्यू, १८ गंभीर जखमी

Samruddhi Mahamarg Accident: काळाची झडप; दुर्गा मूर्ती घेऊन जात असलेल्या पिकअप वाहनाला भरधाव येणाऱ्या ट्रक ने मागून दिलेल्या भीषण धडकेत ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून २१ जण जखमी..

Oct 02, 2026
ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया; कायदा-सुव्यवस्थेवर सवाल करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी.

Sep 30, 2026