IPL King Virat Kohli: विराट कोहलीने आयपीएलमध्ये चौकार आणि षटकारांच्या माध्यमातून नवे विक्रम स्थापित केले आहेत. त्याने ८०० चौकार आणि ३०० षटकारांचा टप्पा गाठला
नवी दिल्ली (Virat Kohli) : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने गुजरात टायटन्सविरुद्ध मैदानात उतरताच इतिहास रचला. त्याने अशी कामगिरी केली आहे, जी जगातील इतर कोणत्याही फलंदाजाने आजपर्यंत केलेली नाही. चिन्नास्वामी स्टेडियमवर आपल्या खेळीतील पहिल्याच चौकारासह, कोहली (IPL 2026) आयपीएलच्या इतिहासात 800 चौकार पूर्ण करणारा पहिला आणि एकमेव खेळाडू ठरला.
विराट कोहलीने रचला आयपीएलमध्ये इतिहास
आपल्या स्फोटक फलंदाजीने किंग कोहलीने (Virat Kohli) पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, तो लीग क्रिकेटचा खरा राजा आहे. (IPL 2026) क्रिकेटच्या या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये चौकार मारण्याच्या बाबतीत विराट कोहलीने स्वतःची एक वेगळीच लीग तयार केली आहे. आतापर्यंत या यादीत शिखर धवन (768 चौकार) कोहलीच्या सर्वात जवळ होता, पण आता विराटने त्याला खूप मागे टाकले आहे. अजून कोणत्याही फलंदाजाने 800 धावांचा जादुई आकडा गाठलेला नाही.
कोहलीने षटकारांचा रचला विक्रम
कोहलीने (Virat Kohli) आपल्या 274 व्या सामन्यात आणि 266 व्या डावात हा टप्पा गाठला. कोहलीने केवळ चौकारांचाच नव्हे, तर षटकारांचाही विक्रम रचला आहे. रशीद खानच्या गोलंदाजीवर षटकार मारून विराट कोहलीने आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. आता (IPL 2026) आयपीएलमध्ये त्याच्या नावावर 300 षटकार झाले आहेत. 300 षटकारांसह तो एका विशेष क्लबमध्ये सामील झाला आहे. या यादीत केवळ ख्रिस गेल (357) आणि रोहित शर्मा (310) त्याच्या पुढे आहेत.
कोहली जबरदस्त फॉर्मात
आयपीएलच्या (IPL 2026) इतिहासातील सर्वाधिक धावा करणारा कोहली आता 9,000 धावांच्या महत्त्वाच्या टप्प्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. या लीगमध्ये त्याच्या नावावर विक्रमी ८ शतके आणि 65 अर्धशतके आहेत. एकूणच, त्याने 72 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत, जो एक विश्वविक्रम आहे. (IPL 2026) आयपीएल 2026 मध्ये (Virat Kohli) कोहलीची बॅटही चांगली कामगिरी करत आहे. त्याने 7 सामन्यांमध्ये 250 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.