Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > महाराष्ट्र

चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली विधान परिषदेत अरुण लखानींचा बिनविरोध विजय

महायुतीच्या नेत्यांकडून महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, असे आवाहन सातत्याने करण्यात येत होते.


चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली विधान परिषदेत अरुण लखानींचा बिनविरोध विजय

Unopposed Election |

(Unopposed Election) महायुतीच्या नेत्यांकडून महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, असे आवाहन सातत्याने करण्यात येत होते. अशातच चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड घडली आहे. काँग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून, त्यानंतर भाजपाचे उमेदवार अरुण लखानी यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला आहे.

उमेदवारी मागे घेतल्यानंतर शैलेश अग्रवाल यांनी काँग्रेसमधील काही स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप केले. निवडणुकीदरम्यान काँग्रेसमधील काही नेत्यांनी भाजप उमेदवाराला मदत केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच भाजपाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ पैसे वाटप करण्याचे कामही काँग्रेसमधील काही नेत्यांनी केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

पक्षांतर्गत गटबाजी, संख्याबळाचा अभाव आणि काही स्थानिक नेत्यांच्या भूमिकेमुळे उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. त्यांच्या या आरोपांमुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणि मतभेद पुन्हा एकदा उघडकीस आले असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुधीर कोठारी यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे निवडणुकीतील प्रमुख प्रतिस्पर्धी मैदानाबाहेर गेल्याने भाजपाचे अरुण लखानी यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी दोन्ही प्रमुख उमेदवारांनी माघार घेतल्याने या मतदारसंघात मतदानाची गरज उरली नाही. परिणामी निवडणूक अधिकाऱ्यांनी अरुण लखानी यांना बिनविरोध विजयी घोषित केले.

अरुण लखानी यांच्या बिनविरोध निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसमधील कथित अंतर्गत कलह आणि अग्रवाल यांनी केलेल्या आरोपांमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या विजयामुळे विधान परिषदेत भाजपाला आणखी एक प्रतिनिधित्व मिळाले आहे.

 

Related to this topic: