Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > महाराष्ट्र

द महाराष्ट्र फाईल्स

‘द महाराष्ट्र फाईल्स’ वादाच्या भोवऱ्यात; सेन्सॉर बोर्डाने लावली कात्री

The Maharashtra Files: ल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला ‘द महाराष्ट्र फाईल्स’ हा चित्रपट नियोजित तारखेला प्रदर्शित होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. २९ मे रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट आता पुढे


‘द महाराष्ट्र फाईल्स’ वादाच्या भोवऱ्यात सेन्सॉर बोर्डाने लावली कात्री

The Maharashtra Files |

मानोरा (The Maharashtra Files ) : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला ‘द महाराष्ट्र फाईल्स’ हा चित्रपट नियोजित तारखेला प्रदर्शित होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. २९ मे रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट आता पुढे ढकलण्यात आला असून, लवकरच नव्या प्रदर्शन तारखेची घोषणा केली जाणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांकडून सुरुवातीला तांत्रिक कारणांचा उल्लेख करण्यात आला असला, तरी सेन्सॉर बोर्डाने काही दृश्ये आणि आशयावर आक्षेप घेतल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनात विलंब झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे चित्रपटाची रिलीज तारीख पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.

बंजारा समाजाच्या न्याय आणि संघर्षावर आधारित असलेल्या या (The Maharashtra Files) चित्रपटाच्या टीझर, ट्रेलर आणि गाण्यांना सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र अचानक प्रदर्शन पुढे ढकलल्याने चाहत्यांची प्रतीक्षा वाढली आहे. चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक संजीवकुमार राठोड यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “संघर्ष हा वंचित आणि बंजारा समाजाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आम्ही या अडथळ्यांवर मात करत जून महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणू.”

‘द महाराष्ट्र फाईल्स’ची (The Maharashtra Files) कथा, पटकथा, लेखन, दिग्दर्शन आणि निर्मितीची जबाबदारी संजीवकुमार राठोड यांनी सांभाळली आहे. तर शालिनी राठोड सहनिर्माती आणि क्रिएटिव्ह दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहेत. आर्यन राठोड यांनी क्रिएटिव्ह प्रोड्यूसरची भूमिका निभावली आहे.

चित्रपटात उषा नाडकर्णी, सयाजी शिंदे, मंगेश देसाई, वीणा जामकर, नागेश भोसले, सुनील गोडसे, सनी लिओनी, सपना चौधरी, गौतमी पाटील, मंगली आणि आर्यन राठोड यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाचे संगीत नितीन सावंत, अजित केतकर आणि सिद्धार्थ कश्यप यांनी दिले आहे. दरम्यान, (The Maharashtra Files) चित्रपटाच्या नव्या प्रदर्शन तारखेची घोषणा लवकरच केली जाणार असून, ‘द महाराष्ट्र फाईल्स’वरील वाद आणि सेन्सॉर प्रक्रियेमुळे हा चित्रपट पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.