LPG पुरवठा उपाययोजना

राज्यात LPG पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शासनाची मोठी उपाययोजना

LPG Supply Scheme: राज्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरवठा सुचारू झाल्याची माहिती अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी दिली. पीएनजी नेटवर्क विस्तारात वाढ.

राज्यात LPG पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शासनाची मोठी उपाययोजना

LPG Supply Scheme

राज्यात पेट्रोलियम पदार्थांचा पुरेसा साठा: अन्न नागरी पुरवठा अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर

मुंबई (LPG Supply Scheme) : राज्यात पीएनजी जोडण्यांची संख्या २५.३६ लाखांवर पोहोचली असून एका महिन्यात ७३ हजार नवीन जोडण्या देण्यात आल्या आहेत. सीजीडी पाईपलाईनसाठी ‘Deemed Permission’ देण्याचा निर्णय घेतल्याने नेटवर्क विस्ताराला गती मिळणार आहे. ज्या ठिकाणी पीएनजी नेटवर्क पोहोचलेले आहे त्याठिकाणी ग्राहकांनी त्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या भागांमध्ये पीएनजी पाईपलाईन टाकणे शक्य नाही त्या ठिकाणी एलपीजीचा पुरवठा पूर्ववत सुरू राहणार असून महाराष्ट्रात एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याची  माहिती  अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे  अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी दिली.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत अपर मुख्य सचिव डिग्गीकर यांनी ही माहिती दिली. यावेळी शिधा नियंत्रक चंद्रकांत डांगे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, ‘पीआयबी’च्या महासंचालक स्मिता वत्स-शर्मा, तेल उत्पादक राज्य समन्वयक उमेश कुलकर्णी, भारत पेट्रोलियम कार्पोरेशन, कृषी संचालक सुनिल बोरकर यांच्यासह संबंधित उपस्थित होते.

पीएनजी व सीजीडी नेटवर्कला चालना

मध्यपूर्वेतील सध्याच्या भू-राजकीय तणावामुळे (LPG Supply Scheme) पेट्रोलियम पदार्थांच्या पुरवठा साखळीवर काही प्रमाणात दबाव निर्माण झाला असला, तरी राज्यातील पुरवठा सुरळीत असल्याचे सांगून अपर मुख्य सचिव डिग्गीकर म्हणाले की,  जिथे जिथे शक्य आहे तिथे पीएनजीचा वापर वाढवण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी पाईप लाईन गॅस पुरवठा शक्य आहे. त्या ठिकाणी ३० जूनपर्यंत पीएनजी बंधनकारक असून ज्या भागांमध्ये पीएनजी पाईपलाईन टाकणे शक्य नाही त्या ठिकाणा एलपीजीचा पुरवठा पूर्ववत सुरू राहणार आहे.  पीएनजी  कनेक्शन ज्या भागांमध्ये उपलब्ध तिथे त्याचा वापर वाढवायचा  असून ग्राहकांच्या दृष्टीने विचार करता पीएनजी स्वस्त असून त्याचे  देशांतर्गत उत्पादन जास्त आहे. पीएनजी नेटवर्क जिथे पोहोचले आहे तिथे  तिथे ग्राहकांनी नोंदणी केली पाहिजे असे अपर मुख्य सचिव डिग्गीकर यांनी यावेळी सांगितले.

 राज्यात सुमारे २४ तेल डेपोमार्फत ८,१०० पेट्रोल पंपांना सेवा (LPG Supply Scheme) पुरवली जात असून दररोज सुमारे १८,५०० केएल पेट्रोल आणि ४०,००० केएल डिझेलचे वितरण केले जात आहे. १ ते ४ एप्रिलदरम्यानची विक्रीही मागील महिन्यांच्या सरासरीशी सुसंगत असल्याने इंधनटंचाईची स्थिती नाही.

एलपीजी पुरवठा नियंत्रणात; डिजिटल बुकिंगला प्रोत्साहन

शिधा नियंत्रक श्री.डांगे यांनी सांगितले की,  राज्यातील २३ बॉटलिंग प्लांट्समार्फत सुमारे २,२०० वितरक आणि ३.५ कोटी ग्राहकांना सेवा दिली जाते. घरगुती एलपीजी सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून दररोज सरासरी ५.८२ लाख रिफिल वितरित केले जात आहेत. वितरण पारदर्शक करण्यासाठी डीएसी (Delivery Authentication Code) सक्तीचा करण्यात आला आहे. ग्राहकांना डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारेच बुकिंग करण्याचे आवाहन करण्यात आले असून सध्या ९५ टक्के बुकिंग ऑनलाईन होत आहेत. न्याय्य वितरणासाठी बुकिंग अंतराल निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

व्यावसायिक एलपीजी पुरवठा टप्प्याटप्प्याने
व्यावसायिक एलपीजीचे (LPG Supply Scheme) वाटप टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा क्षेत्रांना १०० टक्के पुरवठा, तर संरक्षण, रेल्वे, पोलीस यांसारख्या विभागांना ७० टक्के पुरवठा राखण्यात आला आहे. उद्योग आणि इतर क्षेत्रांना २० टक्के ते ५० टक्के पर्यंत पुरवठा दिला जात आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार हॉटेल, उपहारगृहे, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया उद्योग आदी क्षेत्रांना प्राधान्याने अतिरिक्त २० टक्के वाटप करण्यात आले आहे.

काळाबाजार रोखण्यासाठी कडक कारवाई
घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्यभर दक्षता पथके स्थापन करण्यात आली आहेत. १ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान १४,३२९ तपासण्या छापे अंतर्गत ३,६२८  सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. कारवाईदरम्यान २१ वाहतूक वाहने जप्त करण्यात आली असून २ गॅस कॅप्सूल/टँकर्सही ताब्यात घेण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या एलपीजी गॅसचे एकूण प्रमाण ७१,५६५.१४ किलो इतके आहे. या प्रकरणांमध्ये ५३ गुन्हे (FIR) नोंदविण्यात आले असून ३६ जणांना अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण कारवाईत जप्त करण्यात आलेल्या गॅस व वाहनांची एकूण अंदाजे किंमत २ कोटी ३८ लाख ५४ हजार ४९३ रुपये इतकी आहे.

नियंत्रण कक्ष व तक्रार निवारण यंत्रणा सक्रिय
राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. (LPG Supply Scheme) एलपीजी पुरवठ्यासंदर्भात तक्रारींसाठी ९७६९९१९२२१ हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. १७ मार्च ते ६ एप्रिलदरम्यान २,४०९ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यावर कार्यवाही सुरू आहे.

संबंधित सामग्री

कर्नाटकात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; महाराष्ट्रात फक्त आश्वासने?

कर्नाटकात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; महाराष्ट्रात फक्त आश्वासने?

Maharashtra Drought-affected farmers: कर्नाटक सरकारकडून सुमारे 46 ते 50 लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,500 रुपये इनपुट अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेसाठी सुमारे 1,250 कोटी रुपयांचा खर्च

Oct 09, 2026
धक्कादायक: महाराष्ट्रातील 49 हजार गावतलाव काळाच्या पडद्याआड; जलस्रोत संवर्धनाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर

धक्कादायक: महाराष्ट्रातील 49 हजार गावतलाव काळाच्या पडद्याआड; जलस्रोत संवर्धनाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर

Maharashtra Water Resources: ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे पारंपरिक गावतलाव अस्तित्वाच्या संकटाला सामोरे जात आहेत. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या जलस्रोत गणना..

Oct 09, 2026
विधान परिषदेच्या 5 जागांचे चित्र स्पष्ट; बंडखोर मैदानातच, महायुती-मविआचे टेन्शन वाढले!

विधान परिषदेच्या 5 जागांचे चित्र स्पष्ट; बंडखोर मैदानातच, महायुती-मविआचे टेन्शन वाढले!

विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारांचे चित्र स्पष्ट. पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये बंडखोरांमुळे महायुती-मविआचे टेन्शन वाढले.

Oct 09, 2026
सुप्रिया सुळे यांच्या जावयाच्या कंपनीला १२०० एकर जमीन; ४९ वर्षांच्या भाडेपट्ट्यावरून महाराष्ट्रात वाद

सुप्रिया सुळे यांच्या जावयाच्या कंपनीला १२०० एकर जमीन; ४९ वर्षांच्या भाडेपट्ट्यावरून महाराष्ट्रात वाद

सुप्रिया सुळे यांचे जावई सारंग लखानी यांच्या कंपनीला १२०० एकर जमीन ४९ वर्षांसाठी भाड्याने; जमीन वाटपावरून वाद, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि बावनकुळे यांची प्रतिक्रिया.

Oct 09, 2026
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लवकरच? ३० ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लवकरच? ३० ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे संकेत. ३० ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता.

Oct 09, 2026