Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > महाराष्ट्र

नांदेड-मुंबई विमानसेवा

नांदेड-मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

Nanded-Mumbai Air Service: नांदेडच्या आमदारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणव्हीस यांच्याशी भेट घेऊन नांदेड-मुंबई विमानसेवा तातडीने सुरू होण्याची मागणी केली.


नांदेड-मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

Nanded-Mumbai Air Service |

नांदेड (Nanded-Mumbai Air Service) : नांदेड–मुंबई नियमित विमानसेवा लवकरच सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड जिल्ह्यातील आमदारांच्या शिष्टमंडळाला दिली. या निर्णयामुळे नांदेडसह मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. आमदार हेमंत पाटील, राष्ट्वादीचे नेते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार भीमराव केराम, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार आनंदराव बोढारकर आणि आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन विमानसेवा तातडीने सुरू करण्याची मागणी केली.

सध्या नांदेड विमानतळ (Nanded-Mumbai Air Service) सर्व सुविधांनी सुसज्ज असले तरी मुंबई विमानतळावर स्लॉट उपलब्ध नसल्यामुळे ही सेवा बंद आहे. मुंबई येथे नव्या विमानतळाचे काम सुरू असल्याने भविष्यात स्लॉट उपलब्ध होऊन नांदेड–मुंबई विमानसेवा नियमित सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. दररोज सकाळी नांदेडहून मुंबईकडे आणि रात्री मुंबईहून नांदेडकडे विमानसेवा सुरू झाल्यास उद्योग, व्यापार, पर्यटन आणि व्यावसायिक क्षेत्राला मोठी चालना मिळेल. तसेच नांदेड, लातूर, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांनाही या सेवेचा लाभ होणार असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.

विभागीय आयुक्तालयाच्या प्रश्नावरही सकारात्मक भूमिका

यावेळी छत्रपती संभाजीनगर महसूल विभागाचे विभागीय आयुक्तालय नांदेड येथे स्थापन करण्याच्या मागणीकडेही मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधण्यात आले. २०२५ पासून प्रलंबित असलेला हा प्रश्न तातडीने सोडविण्याची विनंती करण्यात आली. नांदेड येथे विभागीय आयुक्तालय झाल्यास नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचून विकासाला गती मिळेल, असे शिष्टमंडळाने सांगितले. यावर सकारात्मक भूमिका घेत हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.