Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > महाराष्ट्र

नांदेड काँग्रेस सत्याग्रह

श्रीराम मंदिर चंदा चोरी विरोधात, काँग्रेसचे रघुपती राघव राजाराम सत्याग्रह

Nanded Congress Satyagraha: नांदेडमधील महावीर चौकवर काँग्रेसेवकांनी रघुपती राघव राजाराम सत्याग्रह केले. ते श्रीराम मंदिराच्या करोडो रुपयांच्या चंडाळीच्या विरोधात आले आहेत.


श्रीराम मंदिर चंदा चोरी विरोधात काँग्रेसचे रघुपती राघव राजाराम सत्याग्रह

Nanded Congress Satyagraha |

नांदेड (Nanded Congress Satyagraha) : अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराच्या करोडो रुपयांच्या चंदा चोरी विरोधात, खा. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात व उत्तर जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे, महानगराध्यक्ष अब्दुल गफ्फार यांच्या पुढाकाराने नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महावीर चौक येथील हनुमान मंदिर परिसरात शुक्रवार (ता.१०) रोजी रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी टाळ मृदुंगच्या गजरात अभंगातून प्रभू श्रीरामाचा जयघोष करण्यात आला.

प्रभू श्रीरामाच्या नावाने राजकारण करत करत थेट अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या करोडो रुपयांचा चंदाचोरी पर्यंत या सरकारचा भ्रष्टाचार पोहोचला आहे. त्यामुळे या (Nanded Congress Satyagraha) सरकारचा हिंदू नामक ढोंगी चेहरा जनतेपुढे आला आहे.

अशी टीका खासदार तथा दक्षिण जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यावेळी केली. उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे व महानगराध्यक्ष अब्दुल गफ्फार यांनी श्री राममंदिर चोरी विरोधात जोरदार निषेध व्यक्त केला. यावेळी माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, प्रदेश सरचिटणीस डॉ. रेखाताई  चव्हाण, सुरेंद्र घोडसकर, एकनाथराव मोरे, आनंद चव्हाण, तिरुपती पाटील कोंढेकर, बालाजी गाडे, श्रीनिवास मोरे, महेश देशमुख तरोडेकर, सत्यपाल सावंत, मधूकर दिघे, अजिज कुरेशी, बाबुभाई खोकेवाले, फारुख भाई, शेर अली, आनंदराव कल्याणकर, बापूसाहेब पाटील, दीपकसिंग हुजुरीया, जसपालसिंग तबेलेवाले, बाळासाहेब आंबेगावकर, मधूकर सोनटक्के,  संजय वाघमारे, गगन यादव, नागराज सुलगेकर, अतुल पेदेवाड, शंकर शिंदे, आंबादास रातोळे, गणेश कोकाटे, अक्षय नळगे, गोविंद पाटील, जेशिका शिंदे, ज्योती कदम, सुरेखा वैद्य, विमलताई कीर्तने, मुरलीधर कल्याणकर, एस.पी. कुभांरे, गौतम सिरसाट, प्रबुद्ध चिते, प्रकाश दिपके, प्रसेनजित वाघमारे, सचिन टाले, गंगाधर आडेराव, संजय कौठेकर, गंगाधर डांगे, प्रितम जोंधळे, कलिम शेख, धनंजय उमरीकर, आदीसह इतर काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच पावडेवाडी येथील भजनी मंडळ हभप गोपीनाथ महाराज पावडेवाडीकर, हभप मोरे महाराज सोनखेडकर, रंजन पावडे, सोपान शिंदे, गंगाधर शिंदे, पांडुरंगराव पावडे, अशोक पावडे, ध्यानेश्वर पावडे आदीजण उपस्थित होते.