शेतात गोवंश ठेवल्या प्रकरणी दाखल झाला होता गुन्हा
वसमत (Syed Imran Ali resigns) : वसमत नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष सय्यद इमरान अली यांनी मंगळवारी रात्री उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. नगराध्यक्षांकडे त्यांनी राजीनामा सुपूर्त केला असून राजीनामा मंजूर करण्यात आला असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले आहे. उपनगराध्यक्षांच्या शेतात गोवंश क्रूरपणे बांधून ठेवल्याचे समोर आले होते त्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.
वसमत नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सय्यद इमरान अली (Syed Imran Ali resigns) मंगळवारी रात्री अचानक उपाध्यक्षपदाचा राजीनामा नगराध्यक्षा सुनीता मनमोहन बाहेती यांच्याकडे सोपवला नैतिक जबाबदारी, प्रकृती अस्वस्थ व वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देण्याचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.
जवळा खंदारबन शिवारातील त्यांच्या शेतामध्ये 19 गोवंश क्रूरपणे बांधून ठेवल्याची घटना घडली होती वसमत ग्रामीण पोलिसांनी छापा मारून गोवंश मुक्त केले होते. त्यानंतर शेतमालक सय्यद इमरान अली यांच्या विरोधात वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या घटनेनंतर वसमत येथे सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने तीव्र निषेध नोंदवून वसमत बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या बदला मोठा प्रतिसाद मिळाला होता. या घटनेनंतर उलट सुलट चर्चा सुरू होत्या.
त्या पार्श्वभूमीवर सय्यद इमरान अली (Syed Imran Ali resigns) यांनी मंगळवारी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी व दोषी विरोधात कारवाई करावी, अशी मागणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सय्यद इमरान अली यांनी केली होती. उपाध्यक्ष पदाचा राजीनामा नगराध्यक्षांनी मंजूर केला आहे. उपाध्यक्षांच्या राजीनाम्यामुळे नगरपालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.