Breaking News
  • माजलगावात अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता
  • लातूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर 17 जण जखमी
  • वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू
  • सलग पाचव्या दिवशी भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
  • फसव्या कर्जमाफीविरोधात रविकांत तुपकरांचा एल्गार; उद्यापासून अन्नत्याग आंदोलन
  • FSSAI कंपनीची मोठी कारवाई, ८ फूड कंपन्याना पाठवली नोटीस
  • अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा
  • पेरणीची घाई करू नका; दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते : मेघना बोर्डीकर
  • नांदेड जिल्ह्यात पाऊस वादळीवारासह पावसाची हजेरी

होम > महाराष्ट्र

गुप्तपणे दिल्ली गाठली! एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्या भेटीमागे काय?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुप्तपणे दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


गुप्तपणे दिल्ली गाठली एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्या भेटीमागे काय

Maharashtra Politics |

विधान परिषद जागावाटपाच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग; शिक्षणसम्राटही भेटीत उपस्थित असल्याची चर्चा

महाराष्ट्र (Maharashtra Politics) : राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपाच्या चर्चांना वेग आलेला असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुप्तपणे दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या भेटीबाबत अत्यंत गोपनीयता पाळण्यात आल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

माहितीनुसार, रविवारी दिल्लीमध्ये एकनाथ शिदे आणि अमित शाह यांच्यात ही भेट पार पडली. विशेष म्हणजे या दौऱ्याबाबत शिंदे गटातील अनेक नेत्यांनाही पूर्वकल्पना नव्हती. त्यामुळे या भेटीमागे नेमके कोणते राजकीय समीकरण आहे, याविषयी उत्सुकता वाढली आहे.

अमित शाहांच्या भेटीसाठी अनेक दिवस प्रयत्न

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी  एकनाथ शिंदे  दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्या वेळी त्यांनी अमित शाह यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, वेळ न मिळाल्याने त्यांना महाराष्ट्रात परतावे लागले. यानंतरही शिंदे यांच्याकडून सातत्याने संपर्क सुरू होता. अखेर शनिवारी रात्री अमित शाह यांच्या कार्यालयातून भेटीसाठी संदेश आल्यानंतर शिंदे रविवारी खासगी विमानाने दिल्लीला रवाना झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, या दौऱ्यात त्यांच्यासोबत कोणताही अधिकृत सहाय्यक किंवा मोठा ताफा नव्हता. त्यामुळे संपूर्ण दौरा अत्यंत गोपनीय ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे.

भेटीनंतर बंगळुरूमार्गे ठाण्यात परतल्याची माहिती

दिल्लीतील भेटीनंतर एकनाथ शिंदे हे थेट बंगळुरूला रवाना झाले आणि तेथून ठाण्यात परतल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण प्रवासामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

महायुतीतील नाराजीची चर्चा

गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील जागावाटप, पक्षीय समन्वय आणि संघटनात्मक निर्णयांवरून शिंदे गटामध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा सुरू आहे. काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडींमध्ये शिंदे गटाची कोंडी होत असल्याची भावना पक्षातील काही नेत्यांमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी पक्ष विस्तारासाठी स्वतंत्र रणनीती आखण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून पक्ष बळकटीकरण आणि नवीन नेत्यांना पक्षात आणण्याबाबत चर्चा सुरू असल्याचेही बोलले जात आहे. मात्र, या रणनीतीसाठी दिल्लीतील भाजप नेतृत्वाची संमती आवश्यक असल्यानेच अमित शाह यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भेटीत शिक्षणसम्राट आणि माजी मंत्र्याची उपस्थिती

या गुप्त दिल्ली दौऱ्यात  एकनाथ शिंदे  यांच्यासोबत राज्यातील एक प्रभावशाली शिक्षणसम्राट आणि शिवसेनेतील माजी मंत्री उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. काही काळापूर्वी या नेत्याचे आणि शिंदे यांचे संबंध ताणले गेले होते. त्यामुळे हा नेता अचानक शिंदेंसोबत दिल्लीला गेल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या भेटीत नेमकी कोणती राजकीय चर्चा झाली, कोणत्या विषयांवर निर्णय झाले आणि आगामी काळात त्याचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related to this topic: