Minister Uday Samant: मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केलेली आहे. प्रसाद लाड चर्चा करत आहेत. विखे पाटील देखील चर्चा करत आहेत. शंभूराजे देसाई देखील चर्चा करत आहेत. त्यांनी काही त्रुटी आम्हाला काढून दिलेले.
वर्धा (Minister Uday Samant) : मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केलेली आहे. प्रसाद लाड चर्चा करत आहेत. विखे पाटील देखील चर्चा करत आहेत. शंभूराजे देसाई देखील चर्चा करत आहेत. त्यांनी काही त्रुटी आम्हाला काढून दिलेले होत्या. काही दाखल्याच्या बाबतीत होत्या. यासंदर्भात त्यांच्याशी संवाद सुरू आहे. त्यांनी आंदोलन करू नये, हीच आमची भूमिका आहे, असे राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत म्हणाले.
राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) वर्ध्यात आले होते. यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. याप्रसंगी मंत्री सामंत म्हणाले की, त्यांच्या प्रकृतीची काळजी आम्हा सर्वांना आहे. मराठा समाजाला जे निर्णय घेतलेले आहे त्यातून काहीही कमी होणार नाही, ही आमची जबाबदारी आहे. ज्या पद्धतीने ओबीसी समाजामध्ये गैरसमज पसरवला जातोय मराठा समाजाला देत असताना ओबीसीच्या आरक्षणावर काही परिणाम होईल का?
ओबीसी समाजाचे काहीही कमी न होता मराठा समाजाला दिलेले शब्द महाराष्ट्र शासन पूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पूर्ण करत होते, आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पूर्ण करतेय, असेही मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) म्हणाले.