Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > महाराष्ट्र

महाराष्ट्र अकरावी प्रवेश

राज्यात अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीची अलॉटमेंट आज जाहीर, 5.64 लाख विद्यार्थ्यांनी लॉक केले अर्ज

Maharashtra Class 11 Admissions: शिक्षण संचालनालयाने अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीचे अलॉटमेंट जाहीर केले, 5.64 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक करून अंतिम नोंदणी केली आहे.


राज्यात अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीची अलॉटमेंट आज जाहीर 564 लाख विद्यार्थ्यांनी लॉक केले अर्ज

Maharashtra Class 11 Admissions |

पुणे (Maharashtra Class 11 Admissions) : महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयामार्फत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी सुरू असलेल्या इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील तिसऱ्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी व कनिष्ठ महाविद्यालय वाटप प्रक्रिया यादी आज सकाळी दहा वाजता जाहीर करण्यात आली आहे. संचालनालयाने काल 22 जून रोजी यासंदर्भात जाहीर प्रकटन प्रसिद्ध केले होते.

राज्यातील एकूण 9669 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये यंदा अकरावी प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. आतापर्यंत (Maharashtra Class 11 Admissions) राज्यभरातून तब्बल 14 लाख 37 हजार 656 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेशासाठी नोंदणी केली असून त्यापैकी तिसऱ्या नियमित फेरीसाठी 20 जून 2026 पर्यंत 5 लाख 64 हजार 300 विद्यार्थ्यांनी कॅप व कोटा प्रवर्गातून आपले प्रवेश अर्ज लॉक करून अंतिम केले आहेत. यामध्ये कॅपसाठी 4 लाख 95 हजार 707 तर कोटा प्रवर्गातून 68 हजार 593 अर्ज लॉक झाले आहेत.

विभागनिहाय आकडेवारी पाहता मुंबई विभागात सर्वाधिक 1 लाख 47 हजार 340 विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक केले आहेत. त्याखालोखाल पुणे विभागात 98 हजार 461 तर नाशिक विभागात 66 हजार 54 विद्यार्थ्यांचे अर्ज अंतिम झाले आहेत. अमरावती विभागात 49 हजार 5, छत्रपती संभाजीनगर विभागात 65 हजार 845, कोल्हापूर विभागात 57 हजार 460, लातूर विभागात 34 हजार 433 आणि नागपूर विभागात 46 हजार 296 विद्यार्थ्यांनी तिसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम लॉक केले आहेत.

शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आज 23 जून रोजी जाहीर झालेल्या अलॉटमेंटनुसार ज्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय मिळाले आहे, त्यांनी आज दुपारी 12 वाजल्यापासून 25 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रत्यक्ष प्रवेश घेणे बंधनकारक आहे. या कालावधीत प्रवेश न घेतल्यास विद्यार्थ्यांचा दावा रद्द होऊ शकतो, असेही संचालनालयाने स्पष्ट केले आहे. 

विद्यार्थी व पालकांनी अधिक माहितीसाठी https://mahafyjcadmissions.in या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी किंवा 8530955564 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच support@mahafyjcadmissions.in या ई-मेल आयडीवर शंका निवारण करता येईल, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे.