Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > महाराष्ट्र

आमदार बसवराज पाटील

देशमुख, निलंगेकर अन् जिल्हा बँक; आमदार बसवराज पाटलांच्या सत्कारामागचा हेतू उघड!

MLA Basavaraj Patil: लातूरकरांनी आमदार बसवराज पाटील यांच्या मंगळवारी सत्कारासाठी खूनी लेटरपॅडचा संदर्भ उघडला. त्यांचे भाषण देशमुख, निलंगेकर आणि जिल्हा बँक परिस्थितीसंबंधीच्या विवादपूर्ण मतांना प्रबोधन


देशमुख निलंगेकर अन् जिल्हा बँक आमदार बसवराज पाटलांच्या सत्कारामागचा हेतू उघड

MLA Basavaraj Patil |

महादेव कुंभार 
लातूर (MLA Basavaraj Patil) :
चाळीस वर्षे राजकारणात राहूनही सत्ताधारी आणि विरोधक ओळखण्यात गोंधळलेल्या भाजपामधील काही लोकांनी घेतलेल्या आमदार बसवराज पाटील यांच्या मंगळवारच्या लातूरमधील सत्कारामागचा हेतू उघड झाला आहे. देशमुख, निलंगेकर आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या विषयाभोवती विधान परिषद सदस्य बसवराज पाटील यांचे 'लेटरपॅड' गुंडाळले जाईल का? याची चर्चा आता सूज्ञ लातूरकरांमध्ये होत आहे.

लातूर ही गुणवंताची खाण आहे, असे दुपारच्या एका कार्यक्रमात विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य, आमदार बसवराज पाटील (MLA Basavaraj Patil) यांनी जाहीरपणे सांगितले होते. लातूरच्या राजकीय सुसंस्कृतपणाची उजळणी करताना आपणही या राजकीय पठडीतून पुढे आलेला आहोत, असेही आमदार बसवराज पाटील यांनी या कार्यक्रमात सांगितले होते. मात्र सायंकाळच्या कार्यक्रमात दस्तूरखुद्द आमदार बसवराज पाटील यांच्या पाठीवर सत्काराची शाल टाकतानाच, त्यांचे 'लेटरपॅड' कुठे वापरायचे! याची वाच्यता झाल्याने आमदार पाटील यांच्या सत्कारामागचा हेतू लातूरकरांसमोर उघड झाला आहे.

विशेष म्हणजे या व्यासपीठावरील 'दर्दीं'ची गर्दी पाहिली तर महायुतीतील मित्र पक्षांबरोबर ज्याची गट्टी जमली, असे व्यक्तिमत्व या गर्दीत आ. बसवराज पाटील (MLA Basavaraj Patil) यांना शोधण्याची वेळ आली असावी. सत्कारातील भाषणे ऐकल्यानंतर लातूरच्या राजकीय सुसंस्कृतपणाची उजळणीच आमदार बसवराज पाटील यांच्यासमोर झाल्याचे स्पष्ट झाले. यावेळच्या भाषणातून आमदार निलंगेकर यांच्या मनातील वेदना पुन्हा एकदा लातूरकरांसमोर प्रकट झाल्या आहेत.

या सत्कारात बोलताना माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी देशमुख आणि जिल्हा बँक यावर सडेतोड भूमिका मांडली. ते म्हणाले, 'देशमुख लबाड बोलतात. देशमुख कुटुंबाने मानसन्मान घेण्याचे काम केले. आता डीसीसी बँकेची निवडणूक आहे. लातूरमध्ये आणलेल्या प्रकल्पाला मातीत घालण्याचे काम देशमुख परिवाराने केले. लोक या देशमुखांना मिस्टर क्लीन म्हणतात. भाजपाला लोकशाही मारणारा पक्ष म्हणून आमच्यावर आरोप करतात. इथले जे आमदार आहेत ना अमित देशमुख त्यांना माझे आव्हान आहे. लातूर जिल्ह्यामध्ये जेवढ्या सोसायटी आहेत, त्या सर्व सोसायटी यांना खुले मतदान करण्याचं आणि तुम्ही निवडणुकीला उभा टाका.. तुमचं डिपॉझिट जप्त करतो!' सर्व तमाम शेतकरी बांधवांना जे बँकेचे सभासद असतील, ज्यांनी ते बँकेचे कर्ज घेतले असेल, अशा सर्वांना मतदानाचा अधिकार द्या आणि होऊ दे निवडणुका! यांना मतदानाचा अधिकार द्या, माझं खुलं आव्हान आहे, काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला आणि अमित देशमुखाना. धीरज देशमुख यांनातर मी बोलत नाही, कारण त्यांना त्यातली माहिती शून्य आहे. यांनी खुल्या पद्धतीने निवडणूक घ्यावी.'

मी आतादेखील साहेबांना (बसवराज पाटलांना) (MLA Basavaraj Patil) बोलताना जिल्हा बँकेची निवडणूक लढविण्याबद्दल बोललो. जी आहे ती परिस्थिती. लातूर जिल्ह्याने आपणाला भाजपचे जे मतदान दिले, त्या बदल्यात मी अधिकाराने मागतोय. साहेब बोलत नाहीत... या जिल्हा बँकेची चौकशी लागायला पाहिजे, तीही आपल्या लेटर पॅडवर मागणी करा. किती संस्थेला किती कर्ज दिले आहे, किती शेतकऱ्यांना किती कर्ज दिले, त्याची वसुली किती केली आहे. हा विषय फार व्हास्ट आहे. याची चौकशी व्हायला पाहिजे. चौकशी होऊन याच्यावर प्रशासक नेमला पाहिजे. आणि मग निवडणूक लावली पाहिजे.

या कार्यक्रमात आमदार निलंगेकरांचे भाषण म्हणजे वरकरणी भाजपा कार्यकर्त्यांसाठी राजकीय वेदनांचे रडगाणे असले तरी देशमुख आणि निलंगेकर यांच्यासाठी ती 'शोले'मधील 'सूरमा भूपाली'चीच भूमिका आहे. याची कदाचित शंभर टक्के खात्री राज्याच्या सहकार मंत्र्यांना असावी... आमदार निलंगेकरांच्या आजोबांचे सहकारी राहिलेल्या आणि निलंगेकरांच्या तीन पिढ्या पाहिलेल्या आमदार बसवराज पाटील यांना याची बरे कल्पना नसेल कशावरून? त्यामुळेच कदाचित त्यांनी 'मी बोलत नाही, करून दाखवतो!' अशा मोजक्या शब्दात आपला संदेश कार्यकर्त्यांना दिला असावा.

आमचा प्रॉब्लेम एक होता, तो तुमच्यामुळे मिटेल!

जिल्हा बँक फार, अत्यंत शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची बँक आहे. त्यामध्ये आपण लक्ष घालू. अनेकांना वाटते भैय्याचे नेतृत्व असावे, त्याची काही गरज नाही. सहकार मंत्री आहेत बाबासाहेब पाटील त्यांना भेटलो. आपले जे सहकार मंत्री आहेत बाबासाहेब पाटील त्यांना भेटलो. त्यांच्या नेतृत्वामध्ये मुख्यमंत्री आणि बावनकुळे साहेब यांनी त्यांना सूचना दिली. आपणाला सर्वांना माहिती म्हणून निवडणुका लढवायच्या आहेत, असे त्यांनी सांगितले, तेव्हा बाबासाहेब पाटील म्हणाले आपण सर्वजण एकच आहोत. सगळे एकच आहे. सरकार कसं चालवायचं साहेब? आमचा प्रॉब्लेम एक होता, तो तुमच्यामुळे मिटेल, असे आम्हाला वाटत आहे. आम्हाला भाषण, आम्हाला विरोधच करायची सवय आहे चाळीस वर्षे. सत्तेत कधी राहिलोच नाही! अशी कबुली ही आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी यावेळी दिली.