Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > महाराष्ट्र

लातूर सहकार भवन

लातूर येथे सहकार संकुलाचे शनिवारी भूमिपूजन

Latur Sahkar Bhavan: लातूरच्या महात्मा फुले मार्केट परिसरावर सहकार विभागाने ११ कॅरेराल्यांना एकाच संकुलात निगडीत करून देण्यात आले आहे. पालकमंत्री आणि मंत्रींच्या हस्ते भूमिपूजन


लातूर येथे सहकार संकुलाचे शनिवारी भूमिपूजन

Latur Sahkar Bhavan |

लातूर (Latur Sahkar Bhavan) : येथील महात्मा फुले भाजी मार्केटच्या मागे सहकार संकुलाची उभारणी करण्यात येणार आहे. या इमारतीचे भूमिपूजन शनिवार, ११ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होईल. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची यावेळी प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. लातूर जिल्ह्यातील नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक व दर्जेदार शासकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सहकार विभागाच्या अधिपत्याखालील लातूर शहरातील ११ क्षेत्रीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी हे सहकार संकुल उभारले जात आहे.

या (Latur Sahkar Bhavan) नवीन इमारतीमुळे शासकीय कामकाज अधिक कार्यक्षम होईल. तसेच नागरिकांना विविध सेवा एकाच ठिकाणी सुलभपणे उपलब्ध होतील. त्यामध्ये आधुनिक कार्यालयीन सुविधा, स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी कक्ष, बैठक व्यवस्था, अभिलेख कक्ष, संगणकीकृत कामकाजासाठी आवश्यक सुविधा, नागरिकांसाठी प्रशस्त प्रतीक्षागृह, स्वच्छतागृहे तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी सुलभ प्रवेश व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या (Latur Sahkar Bhavan) सहकार संकुल इमारत भूमिपूजन कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन लातूर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक व्ही. एल. पोतंगले यांनी केले आहे.

सहकार विभागाची ११ कार्यालये एकाच छताखाली येणार

विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सहायक निबंधक सहाकारी संस्था, जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-1 सहकारी संस्था, जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-1 (साखर), सहकारी संस्था, जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-1 (बँक) सहकारी संस्था, जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-2(पणन) सहकारी संस्था, जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-2 (पदूम) सहकारी संस्था, लेखा परीक्षक श्रेणी -2 सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ विभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, जिल्हा कार्यालय लातूर अशी एकूण ११ कार्यालये सहकार संकुलात एकाच छताखाली येणार आहेत.