Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > महाराष्ट्र

लातूर सहकार संकुल

सहकार संकुल लातूरच्या वैभवात भर घालेल: सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

Latur Sahkar Bhavan: लातूरच्या सहकारी संकल्पनेत 'सहकार सांकुल'चे भुमिपूजन करण्यात आले. मंत्री पाटील यांनी सहकारी चळवळीच्या विस्तारासाठी शासनाचे प्रयत्न महत्त्वाचे मानले.


सहकार संकुल लातूरच्या वैभवात भर घालेल सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

Latur Sahkar Bhavan |

 

सहकार संकुल इमारतीचे भूमिपूजन उत्साहात

लातूर (Latur Sahkar Bhavan) : सहकार चळवळ ही आपल्या राज्याची वेगळी ओळख आहे. राज्यातील लाखो संसार सहकारामुळे उभे राहिले आहेत. बदलत्या काळानुसार सहकाराचे स्वरूप बदलत असून या क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. लातूर येथे उभारण्यात येणारे सहकार संकुल हे लातूरच्या वैभवात भर घालणारे आणि सहकार चळवळीला अधिक सक्षम करणारे ठरेल, असा विश्वास सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केला. लातूर येथे सहकार संकुल इमारतीचे भूमिपूजन शनिवारी (दि.११) सहकार मंत्री बाबासाहेब पाटील अध्यक्षतेखाली आणि लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

या (Latur Sahkar Bhavan) कार्यक्रमाला विधान परिषद सदस्य तथा मुख्य प्रतोद आमदार विक्रम काळे, जिल्हा परिषद अध्यक्षा उषाताई पाटील तळेगावकर, लातूरच्या महापौर जयश्री सोनकांबळे, नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, समाज कल्याण सभापती उत्तम माने, अहमदपूर पंचायत समितीचे सभापती सूरज पाटील, विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा उपनिबंधक व्ही. एल. पोतंगले, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता रूपा राऊळ, अधीक्षक अभियंता बाबासाहेब थोरात यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी यावेळी उपस्थित होते.

सहकार चळवळीमुळे आजवर राज्यात मोठा रोजगार निर्माण झाला. असून ही चळवळ जिवंत राहणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील सहकारी चळवळीचे माध्यम असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना केवळ पारंपारिक व्यवसायापुरते मर्यादित न ठेवता, त्यांच्या माध्यमातून किराणा दुकानांपासून ते जेनेरिक औषध दुकानांपर्यंत विविध नवे उद्योग व व्यवसाय सुरू करण्याची परवानगी शासनाने दिली आहे. यामुळे सहकार क्षेत्रातून रोजगाराची नवनवीन दालने खुली होणार आहेत. बदलत्या काळात सहकार क्षेत्रात अमूलाग्र बदल होत असून, राज्याला १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यात सहकार चळवळ महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास सहकार मंत्री पाटील यांनी व्यक्त केला. राज्य शासनाने आणलेल्या अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असेही सहकार पाटील मंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या सहकारी संस्थांसाठी उभारण्यात येणारे सहकार संकुल वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावे, असे आमदार विक्रम काळे यावेळी म्हणाले.
प्रास्ताविक विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले. सहायक निबंधक श्री. गडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

'सहकार संकुल' उपयुक्त ठरेल: पालकमंत्री 

सहकार चळवळीने ग्रामीण भागासह संपूर्ण राज्याच्या प्रगतीला मोठा हातभार लावला आहे. सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या लातूर जिल्ह्यातील सहकारी संस्था व बँकांना अधिक सक्षम करण्यासाठी आणि सहकार विभागाच्या सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध होण्यासाठी 'सहकार संकुल' उपयुक्त ठरेल, असा विश्वास पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राला सहकाराची समृद्ध परंपरा आहे. सहकारी संस्थांसाठी सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळणार असून यामुळे वेळेची बचत आणि सेवांमध्ये सुलभता निर्माण होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

Related to this topic: