Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > महाराष्ट्र

लहान 5kg सिलेंडर

स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर

5kg Gas Cylinder: केंद्र सरकारने स्थलांतरित कामगारांसाठी 5 किलो गॅस सिलेंडर आता कनेक्शनशिवाय उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कामगारांना सुलभता आणि दिलासा मिळणार आहे.


स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर

5kg Gas Cylinder |

नवी दिल्ली/ मुंबई (5kg Gas Cylinder) :  केंद्र सरकारने देशभरातील विविध राज्यांमध्ये काम करणाऱ्या स्थलांतरित कामगारांसाठी एक मोठा आणि आश्वासक निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव डॉ. नीरज मित्तल यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून, 5 किलो FTL (फ्री ट्रेड एलपीजी) सिलेंडरचा पुरवठा तात्काळ प्रभावाने दुप्पट करण्याचे निर्देश दिले आहेत.

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही कमतरता टाळण्यासाठी स्थलांतरित कामगारांना होणारा 5 किलो सिलेंडरचा दैनंदिन पुरवठा आता दुप्पट करण्यात आला आहे. (5kg Gas Cylinder) कनेक्शनशिवाय 5 किलो सिलेंडर मिळणार आहे.

जुन्या नियमात मोठा बदल, 5 किलो सिलेंडरचा पुरवठा दुप्पट

21 मार्च 2026 रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये निश्चित केलेली 20% ची मर्यादा हटवण्यात आली आहे. आता, 2-3 मार्च 2026 दरम्यानच्या सरासरी दैनंदिन पुरवठ्याच्या आधारावर, अधिक गरजू लोकांना सिलेंडर उपलब्ध व्हावेत, यासाठी (5kg Gas Cylinder) सिलेंडरची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. या सिलिंडर्सचे वितरण राज्य सरकारांच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागांमार्फत केले जाईल.

तेल विपणन कंपन्या (OMCs) या प्रक्रियेत सहकार्य करतील आणि ही सुविधा केवळ स्थलांतरित कामगारांपुरतीच मर्यादित राहील याची खात्री करतील. वाढती मागणी पूर्ण करणे आणि गरजू लोकांना गॅस सहज उपलब्ध करून देणे, हा या निर्णयाचा उद्देश आहे.

स्थलांतरित कामगारांसाठी मोठा दिलासा

पश्चिम आशियातील तणाव आणि एलपीजीच्या वाढत्या मागणीमुळे, स्थलांतरित कामगारांना (5kg Gas Cylinder) सिलिंडर्स मिळवण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. डॉ. नीरज मित्तल यांच्या आदेशानंतर, आता राज्यांकडे पुरेसा साठा उपलब्ध असेल. हा सिलिंडर लहान, किफायतशीर आहे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे नेता येतो.

एकदा सिलिंडर खरेदी केल्यावर, तुम्ही कोणत्याही अधिकृत केंद्रावर फक्त गॅसची किंमत देऊन तो पुन्हा भरू शकता. पश्चिम आशियातील सध्याच्या तणावामुळे आणि देशात एलपीजीच्या वाढत्या मागणीमुळे अनेक भागांमध्ये गॅसची टंचाई जाणवत आहे. परिणामी, (5kg Gas Cylinder) लहान सिलिंडर्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, विशेषतः ज्यांच्याकडे कायमस्वरूपी गॅस कनेक्शन नाही त्यांच्यामध्ये.

Related to this topic: