Breaking News
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
  • मुक्ताईनगरात दोन गुटखा तस्कर जेरबंद, वाहन जप्त
  • नाशिकला पुढील 3 दिवसाचा पावसाचा यलो अलर्ट
  • मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही
  • सरकारी कार्यक्रमात आमदारपुत्राचा प्रचार? उमरग्यातील बॅनरवरून वादाची चिन्ह
  • जंतर-मंतरवरील कथित लाठीचार्जचा बुलढाण्यात निषेध; रमाईच्या लेकींचे आंदोलन
  • बुलढाण्यात आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार?
  • सायली खरे यांचा सुरांनी दिला CJP आंदोलनाला पाठिंबा!

होम > महाराष्ट्र

शेतकरी आत्महत्या

निलंगा तालुक्यात आठ दिवसात, चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या!

Farmer Suicides: कर्जाचा डोंगर, वाढती महागाई आणि सावकारी फासामुळे मेटाकुटीला आलेल्या चार शेतकऱ्यांनी निलंगा तालुक्यात गेल्या आठ दिवसांत आत्महत्या केल्या. यापैकी एक आत्महत्या तर कृषिदिनी झाली.


निलंगा तालुक्यात आठ दिवसात चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Farmer Suicides |


बी-बियाणांसाठी पैसे नसल्याने कृषीदिनी बळीराजांने घेतला गळफास! 

निलंगा (Farmer Suicides) : कर्जाचा डोंगर, वाढती महागाई आणि सावकारी फासामुळे मेटाकुटीला आलेल्या चार शेतकऱ्यांनी निलंगा तालुक्यात गेल्या आठ दिवसांत आत्महत्या केल्या. यापैकी एक आत्महत्या तर कृषिदिनी झाली. निलंगा शहरातील गांधीनगर भागात राहणारे मधुकर तुकाराम पाटणकर (५३) यांनी बँक तसेच खासगी सावकाराकडून कर्जाच्या वसुलीसाठी लागलेल्या तगाद्यामुळे वैतागून कृषिदिनीच घरातल्या पंख्याला गळफास घेतला. मधुकर पाटणकर हे अल्पभूधारक. पाऊस पडला तरी पेरणी करण्यासाठी बी-बियाणे, खते खरेदीसाठी पैसे नसल्यामुळे ते चिंतेत होते. 'मी कर्जाला कंटाळून आणि शेतात पेरणी करण्यासाठी बी-बियाणे घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे आत्महत्या करत आहे' अशी चिठ्ठीच त्यांच्या खिशात सापडली. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. 

निलंगा तालुक्यातील जामगा येथील पंडित रामा पवार (४८) यांनी ३० जून रोजी सकाळी सहाच्या सुमारास शेतातील झाडाला गळफास जेवून आत्महत्या केली. तालुक्यातील अनसरवाडा येथील अल्पभूधारक शेतकरी गुणवंत व्यंकटराव माने (६५) यांनी कर्ज आणि सततच्या आर्थिक विवंचनेला कंटाळून ३० जून रोजी शेतातच गळफास घेतला. या कुटुंबाची शोकांतिका अत्यंत वेदनादायी आहे. गुणवंतराव यांच्या एका मुलीचा काही वर्षांपूर्वीच सर्पदंशाने मृत्यू झाला. या (Farmer Suicides) धक्क्यातून माने कुटुंब सावरत नाही तोच दोन वर्षांपूर्वी त्यांच्या धाकट्या मुलाचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. तर दुसऱ्या मुलाला कर्करोगाने ग्रासले. उपचार सुरू असतानाच त्याचाही मृत्यू झाला. काही वर्षांच्या अंतराने तीन तरुण अपत्यांचा मृत्यू झाल्याने गुणवंतराव खचून गेले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विधवा सुना, तीन नातू आणि दोन नाती असा परिवार आहे.

सोनखेड येथील मारुती मनोहर सोळुंके (३६) या तरुण शेतकऱ्याने कर्जामुळे होणाऱ्या ओढाताणीतून २५ जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आपल्या राहत्या घरी पंख्याला गळफास घेतला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर २७ जून रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.